निसर्ग चक्रीवादळाचे (Nisarga Cyclone) डिप डिप्रेशन (Deep Depression) मध्ये रुपांतर होणार असून सोमवारी रात्री अरबी समुद्राजवळून गोवा, मुंबई आणि सुरत येथे धडकणार आहे. आयएमडी (IMD) या हवामान खात्यानुसार, चक्रीवादळ गोव्यातील पणजीमच्या साऊथ वेस्ट येथे 360 कि.मी, महाराष्ट्रातील मुंबईच्या साऊथ वेस्ट येथे 670 किमी आणि गुजरातमधील सुरतच्या साऊथ-साऊथवेस्ट येथे 900 कि.मी. वेगाने येणार आहे. निसर्ग चक्रीवादळ कमी दाबाचा गहिरा पट्टा पुढील 12 तासात निर्माण करणार आहे. तर अरबी समुद्रात पुढील 24 तासात धडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हवामान खात्याने असे सांगितले आहे की, निसर्ग चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेला 2 जूनला सकाळी धडकणार आहे. चक्रीवादळ येत्या 3 जूनला महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात धडकणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने असे म्हटले आहे की, निसर्ग चक्रीवादळ 3 जूनला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर धडकू शकते.(Nisarga Cyclone Tracker: अरबी समुद्रात 3 जून पर्यंत तीव्र होणार चक्रीवादळ; पहा 'निसर्ग' चक्रीवादळाच्या प्रवासाच्या प्रत्येक दिवसाचे अंदाज)
आयएमडीच्या नकाशाकडे पाहिले असता निसर्ग वादळाचा मार्ग लाल रंगाचा आहे तर हिरवा प्रदेश अनिश्चिततेचा मार्ग दाखवितो. म्हणजे चक्रीवादळाने मार्ग बदलला तर, त्या भागात येणारे क्षेत्र हिरव्या भागावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जर सोमवारी निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरत येथे धडकल्यास या क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 2 जूनला पहाटे 5.30 वाजता डिप्रेशनचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. पुढे ते गुजरातच्या दिशेने जाणार असून 3 जून रोजी सकाळी चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे. त्यानंतर निसर्ग चक्रीवादळ 24 तासानंतर 4 जूनला अधिक गंभीर होणार आहे. मात्र त्यानंतर संध्याकाळी चक्रीवादळ सामान्य रुप धारण करणार आहे.(Nisarga Cyclone संबंधित गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली NDMA च्या अधिकाऱ्यांसह महत्वाची बैठक)
निसर्ग चक्रीवादळ 1 ते 4 जून दरम्यान नॉर्थ महाराष्ट्र आणि गुजरात येथे घोंघावणार आहे. या दोन्ही राज्याच्या किनारपट्टीवरुन निसर्ग चक्रीवादळ जाणार आहे. महाराष्ट्राला 720 किमीचा किनारपट्टा लाभला असून तो ठाणे, रायगड, ग्रेटर बॉम्बे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा आहे. तर गुजरातला 1600 किमीची किनारपट्टी लाभली असून त्यामध्ये 15 किनारपट्टीच्या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामध्ये जमनागर, गिर सोमनाथ, कच्छ, जुनागढ, पोरबंदर, देवभुमी द्वारका, मोरबी, अमरेली, भरुच, भावनगर, आनंद, वलसाड, नावसरी, सुरत आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील नॉर्थ क्षेत्रात येणाऱ्या सर्व जिल्ह्यांत आणि गुजरातमधील साऊथ क्षेत्रात चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येणार आहे.
तसेच गुजरातसह दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली येथे येत्या 3 जून रोजी मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचसोबत दमण, दीव, दादरा आणि नगर हवेले येथे 4 जूनला अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.