Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे आज कमी दाबांचे क्षेत्र अधिक मजबूत होणार आहे, त्यामुळे चक्रीवादळात  होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे, तर या आधी देखील हमून चक्रीवादळ महाराष्ट्रात आलं होत. त्यानंतर मिचॉन्ग चक्रीवादळ (Michaung Cyclone)  येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. आज बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पाऊस असणार आहे.

राज्यात चक्रीवादळामुळे वातावरणात परिणाम होताना दिसणार आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यापासून राज्यात  रिमझिम पाऊस आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे दरम्यान चक्रीवादळामुळे शेतातील आणखी पिकांचे नुकसान होणार आहे. यंदा शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. तर काही भागात हवामान कोरडं राहणार आहे. (हेही वाचा- मिचॉंग चक्रीवादळ, तामिळनाडूमध्ये पर्जन्यवृष्टी; महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे ढग)

कोकण किनारपट्टीवर कोरडं वातावरण असणार आहे. मुंबई, ठाणे,पालघर या भागात गारठा जाणवणार आहे. पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी रिमझिम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे.मराठवाड्यात आणि विदर्भात वीजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.  24 तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.