Maharashtra Weather Forecast: मिचॉंग चक्रीवादळ देशभरामध्ये अवकाळी पावसाचे सावट (Cyclone Michaung Updates) घेऊन आले आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने (IMD Forecast) विविध राज्यांना पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे. खास करुन, तामिळनाडूमध्ये सतत पडणारा पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन, चेन्नई जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सरकारी शाळा 2 आणि 3 डिसेंबर रोजी बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आव्हानांनापासून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाच्या स्थितीनुसार खासगी शाळा आणि महाविद्यालयांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुसऱ्या बाजूला केवळ तामिळनाडूच नव्हे तर देशभरातील इतर राज्यांमध्येही पर्जन्यवृष्टी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही अवकाळी पाऊस (Unseasonal Rain In Maharashtra) पण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तामिळनाडू समुद्रकिनारपट्टीवर सावधगिरीचा इशारा
भारतीय हवामान खात्याच्या संभाव्य चक्रीवादळाच्या इशाऱ्याने सतर्कता बाळगली जात आहे. खास करुन तामिळनाडू राज्यातील समुद्रकिनारपट्टी भागात सावधगिरी आणि निर्वासन उपाय योजले आहेत. येणार्या चक्रीवादळामुळे नागापट्टिनम जिल्ह्यातील वेलंकन्नी किनारपट्टी भागातील समुद्र नेहमीपेक्षा जास्त उग्र असल्याचे नोंदवले गेले आहे. शिवाय या ठिकाणची दृश्यमानताही बरीचशी कमी झाली आहे.
'सायक्लोन वॉर्निंग केज-नं-1'
ईशान्य मान्सूनची तीव्रता वाढत असताना तमिळनाडूमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. नागापट्टिनम बंदरासह पाच बंदरांवर 'सायक्लोन वॉर्निंग केज-नं-1' फडकवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अधिका-यांना संवेदनशील भाग रिकामे करण्यासह आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आयएमडीकडून मुसळधार पावसा अंदाज व्यक्त
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे 3 आणि 4 डिसेंबर रोजी मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे पूर्वतयारी म्हणून, सीएम स्टॅलिन यांनी मदत शिबिरांमध्ये सतत अन्न, वीज आणि आवश्यक पुरवठा करण्यावर भर दिला. पडलेली झाडे काढून टाकणे, सरकारी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन कक्षांची उपलब्धता आणि अन्न केंद्रांची तयारी या सावधगिरीच्या उपायांपैकी एक राज्य अधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या आढावा बैठकीत ठळकपणे सांगितले.
एक्स पोस्ट
Tamil Nadu | Moderate Thunderstorms and lightning with Moderate rain is very likely at isolated places over Thiruvallur, Kancheepuram, Chengalpattu, Chennai, Tenkasi, Thoothukudi, Thirunelveli and Kanniyakumari districts of Tamilnadu. Light Thunderstorm and lightning with Light… pic.twitter.com/nfXxzri2D2
— ANI (@ANI) December 2, 2023
याव्यतिरिक्त, मिचौंग चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून पुद्दुचेरी, कराईकल आणि यानाम प्रदेशातील शाळा 4 डिसेंबर रोजी बंद राहतील. चक्रीवादळाचा किनारी भागांवर होणारा अपेक्षित परिणाम लक्षात घेऊन प्रादेशिक प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडू राज्यावर अधिक असला तरी त्याचे परिणाम राज्याच्या इतर भागातही पाहायला मिळू शकतात. महाराष्ट्रामध्ये आज पहाटेपासूनच आकाश ढगाळ असल्याचे पाहायला मिळत आहे.