महाराष्ट्र एकीकडे कोरोना वायरसचा (Coronavirus) सामना करत असताना राज्यात निपाह वायरस (Nipah virus In Maharashtra) आढळल्याचं वृत्त समोर आलं आहे. महाराष्ट्रात पाहिल्यांदाच दोन वटवाघुळांच्या प्रजातींमध्ये निपाह वायरस आढळल्याचं पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी (National Institute of Virology) कडून सांगण्यात आले आहे. मार्च 2020 मध्ये सातार्यातील महाबळेश्वर मधील गुंफेमध्ये आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना एनआयव्हीच्या प्रमुख अभ्यासकर्ता डो. प्रग्या यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात वटवाघुळांमध्ये निपाह कधीच आढळला नव्हता.
जगभरात निपाह हा हा एक जीवघेणा विषाणू समजला जातो. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे. प्राण्यांमधून माणसामध्ये त्याचा प्रसार झाल्यानंतर तो अत्यंत जीवघेणा आजार असतो. त्यामुळे या आजाराबाबतही चिंता व्यक्त केली जाते. ‘Journal of Infection and Public Health’मध्ये सध्या एनआयव्ही चा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. नक्की वाचा: पेरु खल्ल्याने निपाह आजाराची लागण? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक केरळ राज्यात रवाना; रुग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला.
निपाह हा अत्यंत जीवघेणा आजार आहे. त्याच्यावर काही उपचार, वॅक्सिन अद्याप उपलब्ध नाही त्यामुळे या आजराबाबत भीती देखील आहे. सोबतच कोरोनाचा मृत्यू दर जेथे 1-3% आहे तिथे निपाहचा मृत्यूदर 65 ते100% आहे. मागील काही वर्षांमध्ये वटवाघुळांच्या माध्यमातून अनेक आजार पसरत त्यामध्ये इबोला, Marburg चा देखील समावेश आहे. दरम्यान कोरोना वायरसच्या उगमस्थानामध्येही वटवाघुळांची महत्त्वाची भूमिका असल्याचं काही संशोधनातून समोर आलं आहे.
भारतामध्ये जेव्हा पहिल्यांदा निपाह आढळला होता तेव्हा तो leschenaultii bats मध्ये आढळला होता आता महाबळेश्वर मध्ये 33 leschenaultii आणि एका Pipistrellus या वटवाघुळांमध्ये निपाह वायरस आहे. असा एनआयव्हीचा अहवाल आहे.