राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन बाजूला होण्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात भूकंप झाला. ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या अवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवार यांनी ही आज मंगळवारी (2 मे 2020) ही घोषणा केली. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अभूतपूर्व घडामोडी घडल्या. कार्यकर्त्यांना धक्का बसला पदाधिकारी आणि नेत्यांना अश्रू अनावर झाले. वायबी चव्हान सेंटरमध्ये भावूक वातावरण निर्माण झाले.
शरद पवार यांनी म्हटले की, प्रदीर्घ काळ सामाजिक जीवनात राहिल्यानंत आता कोठेतरी थांबण्याची आवश्यकता आहे. शरद पवार यांनी जाहीर केलेला निर्णय अनपेक्षीत होता. ज्याची राजकीय वर्तुळात यत्किंचीतही कल्पना नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीतील नेत्यांसह सर्वांनाच धक्का बसला.
कार्यकर्त्यांचा विरोध
शरद पवार यांनी निर्णय जाहीर करताच कार्यकर्त्यांतून तीव्र प्रतिक्रिया आली. आपण आपला निर्णय बदलावा अन्यथा आपणही संघटनेतून राजीनामा देऊ अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांचा नूर लक्षात येताच शरद पवार यांनीही सांगितले की, मी पक्षाच्या अध्यक्ष पदावरुन बाजूला होणार आहे. संघटनेतून नव्हे. मी पक्षातच सक्रीय राहणार आहे. शिवाय लवकरच आम्ही एक समिती नेमणार आहोत. ही समिती तसेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांनी निर्णय घ्यावा, असे शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, Sharad Pawar: शरद पवारांना कार्यकर्त्यांच्या कौल मान्य असेल - अजित पवार)
नेत्यांना अश्रू अनावर
शरद पवार यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांना आश्रू अनावर झाले. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे अशा नेत्यांना अश्रू अनावर झाेले.
प्रमुख नेत्यांकडून निर्णय परत घेण्याची मागणी
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा तुमचा निर्णय आम्ही मानायला तयार नाही. तुम्ही तुमच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी आमची इच्छा आहे, असे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आणि दिलीप वळसे पाटील म्हणाले.
दरम्यान, शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहतात की, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या दबावामुळे निर्णय मागे घेतात याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीतही अशी घटना घडली होती. बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुख पदाचा राजीनामादिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि बाळासाहेब ठाकरे यांना राजीम्याची घोषणा मागे घ्यावी लागली होती. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्या बाबतीतही असेच काही घडते का याबाबत उत्सुकता आहे.