Navi Mumbai Drugs Case: नवी मुंबईतून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांनी दोन छाप्यांमध्ये 63,200 रुपये किमतीचे ड्रग्ज (Drugs) जप्त केले असून या संदर्भात एका महिलेसह पाच जणांना अटक केली आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी नवी मुंबईतील कोपरी गावातील एका चाळीजवळ छापा टाकला आणि त्यांच्या ताब्यातून 21.14 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करून चौघांना अटक केली, असे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस या संदर्भात आणखी चोख तपासणी करणार आहे.
ताहिर मोहम्मद अली (25), मोहम्मद जुनेद पोस्कर खान (22), रफिक अझीझ शेख (21) आणि नीलेश भोईर (32) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी शुक्रवारी त्याच गावात आणखी एक छापा टाकला आणि कविता राठोड (30) या महिलेला अटक केली आणि तिच्या ताब्यातून 1,060 ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त केलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत 63,200 रुपये आहे, असे पोलिसांनी सांगितले. बऱ्याच दिवसांपासून येथे ड्रग्ज बाळगले जात होते.अशी माहिती समोर आली आहे. पोलीसांनी सर्तक राहून छापा टाकला आणि आरोपींला ताब्यात घेतले.
आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. आरोपींनी अमली पदार्थ कोठून आणले आणि ते कोणाला विकण्याचा त्यांचा कट होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. या संदर्भात पोलीसांनी कंबर कसून चौकशी सुरु केली आहे. पोलीसांना अद्याप संपुर्ण माहिती मिळाली नाही त्यामुळे पोलीस खास पथकाची निवड करणार असल्याचे सांगितले आहे.