Navi Mumbai: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ( Anti-Corruption Bureau, एसीबी) ठाणे युनिटने उरण पोलीस ठाण्यातील (Uran Police Station) एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला (Police Sub-Inspector) लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्याला 14 जून रोजी एसीबीने 50 हजार रुपये स्वीकारताना पकडले.
सिंधू तुकाराम मुंडे असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. एसीबी, ठाणे येथील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांवर दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे 60 हजार रुपयांची मागणी केली होती. (हेही वाचा -Thane: 50 हजारांची लाच मागणाऱ्या 52 वर्षीय महिला नायब तहसीलदाराला अटक)
मात्र, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंडे यांना 50 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.(वाचा - Thane: क्रिप्टोकरन्सी फसवणुकीत 36 लाख रुपये गमावलेल्या मोबाइल फोन दुकान मालकाला एक वर्षानंतर परत मिळाली संपूर्ण रक्कम)
दरम्यान, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठाण्यात 50 हजारांची लाच मागणाऱ्या 52 वर्षीय महिला नायब तहसीलदाराला अटक करण्यात आली होती. फेरफार आक्षेप नोंदविण्याचा अंतिम अहवाल देण्याच्या बदल्यात त्यांनी मागितलेल्या 1.50 लाख रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50,000 रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांना पकडण्यात आले होते.