धक्कादायक! प्रेमप्रकरणातून सहावीची विद्यार्थिनी गर्भवती
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पेठ तालुक्यातील खरपडी येथील शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.

दहावी मध्ये शिकणारा मुलगा आणि सहावीतील विद्यार्थिनी हे पेठ तालुक्यात राहणारे असून दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. मुलगी शिकत असलेल्या आश्रमशाळेत त्यांची नियमीत तपासणी केली जाते. परंतु तीन महिने झाले तरीही आश्रमशाळेच्या अधिक्षकांना हा प्रकार लक्षात आला कसा नाही याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.(हेही वाचा-मुंबई: जुहू परिसरात 9 वर्षांच्या चिमुकलीची बलात्कार करुन हत्या)

रविवारी हा प्रकार आश्रमशाळेत उघडकीस आल्यानंतर मुलीच्या पालकांनी पोलिसात मुलाविरुद्ध तक्रार केली आहे. तर घरातील मंडळी या दोघांचे लग्न लावून देण्यास तयार असून सध्या अल्पवयीन आहेत. तर मुलीची वैद्यकिय तपासणीसाठी तिला रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालय असूनही त्र्यंबकेश्वर येथे तपासणी करता येणार नसल्याचे सांगत त्यांना परत पाठवून देण्यात आले असल्याचा प्रकार घडला आहे.