मुंबई: जुहू परिसरात 9 वर्षांच्या चिमुकलीची बलात्कार करुन हत्या

पीडिता ही गेले दोन दिवस बेपत्ता होती. या पीडितेचा शोध सुरु होता. अखेर तिचा मृतदेह नेहरु नगर येथील सार्वजनिक शौचालयात सापडला. पीडितेच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती पुढे आली.

मुंबई: जुहू परिसरात 9 वर्षांच्या चिमुकलीची बलात्कार करुन हत्या
Juhu Police Station | (Photo Credits: ANI)

नऊ वर्षांच्या चिमूकलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करुन पीडितेचा मृतदेह सार्वजनिक शौचालयात टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबई (Mumbai) येथील जुहू (Juhu ) परिसरात समोर आली आहे. गेले दोन दिवस पीडिता बेपत्ता होती. अखेर नेहरु नगर येथील सार्वजनिक शौचालयात पीडिेतेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात देवेंद्र वड्डी (वय 35 वर्षे) नावाच्या एका व्यक्तीला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. संतप्त नागरिकांनी जुहू पोलिस स्टेशन (Juhu Police Station) येथे मोठी गर्दी केली होती.

घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिक संतप्त झाले. संतप्त नागरिकांनी जुहू पोलिस स्थानकासमोर मोठी गर्दी केली. या वेळी जमाव मोठ्या प्रमाणावर संतप्त झाला होता. संतप्त जमावाने आरोपीला आमच्या तब्यात द्या अशी मागणीही पोलिसांकडे गेली. पीडिता ही गेले दोन दिवस बेपत्ता होती. या पीडितेचा शोध सुरु होता. अखेर तिचा मृतदेह नेहरु नगर येथील सार्वजनिक शौचालयात सापडला. पीडितेच्या मृतदेहाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती पुढे आली. (हेही वाचा, 'आई' शब्दाला काळिमा; आईच्या संमतीने तीन वर्षाच्या मुलीवर, दोघांचा तब्बल 10 दिवस लैंगिक अत्याचार)

एएनआय ट्विट

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीत देवेंद्र वड्डी नावाच्या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे पुढे आले. वड्डी हा गुन्हेगारी पार्श्वभूमिचा आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक वेळा गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2019 06:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).