Sameer Bhujbal, Hemant Godse | (Photo Credit: Facebook)

Nashik Lok Sabha Constituency: नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Lok Sabha Constituency) या वेळी चौरंगी लढत अनुभवत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) , काँग्रेस (Congress) आघाडीने माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना तिकीट दिले आहे. तर, शिवसेना (Shiv Sena) - भाजप (BJP) युतीने विद्यमान खासदार हेमंत गोडसे ( Hemant Godse) यांनाच पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. बहुजन वंचित आघाडी (VBA) तर्फे पवन पवार (Pawan Pawar) आणि अपक्ष म्हणून माजी आमदार माणिकराव कोकाटे लोकसभेच्या आघाड्यात उतरले आहेत. नाही म्हटले तरी हे चारीही उमेदवार तसे चर्चित आणि लोकसंपर्क असलेले आहेत. त्यामुळे या वेळी या मतदारसंघातील लढत उत्सुकता वाढवणारी ठरणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा तसा राष्ट्रवादीचा गड. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गडाला शिवसेना-भाजपने सुरुंग लावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच तगडे नेते छगन भुजबळ हे येथून नेतृत्व करतात. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांना पराभूत केले. वर्ष बदलले तरी उमेदवार तेच आहेत. राजकीय परिस्थिती बदलली असली तरी, संघर्ष जुनाच आहे. हेमंत गोडसे विरुद्ध समीर भुजबळ हा संघर्ष कसे रुप घेतो यावर विजयाची बरीच समिकरणं अवलंबून असणार आहेत. (हेही वाचा, महाराष्ट्राचे राजकारण ढवळून टाकणारे बहुचर्चीत लोकसभा मतदारसंघ आणि लक्ष्यवेधी लढती)

नाशिक लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ

  • सिन्नर विधानसभा मतदारसंघ
  • नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ
  • नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ
  • नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ
  • देवळाली विधानसभा मतदारसंघ
  • इगतपुरी विधानसभा मतदारसंघ

लोकसभा निवडणूक 2014 निवडणूक मतदान आकडेवारीनुसार

  • हेमंत गोडसे शिवसेना 494735
  • छगन भुजबळ राष्ट्रवादी 307399
  • डॉ. प्रदिप पवार मनसे 63050
  • दिनकर पाटील बसपा 20896
  • तानाजी जयभावे कम्युनिस्ट पक्ष 17154

2019 मध्ये झालेल्या निवडणूक निकालावर नजर टाकली असता त्या वेळी थेट लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी झाली होती. अर्थात मनसे, बसपा आणि कम्युनिस्ट पक्ष रिंगणात होते. मात्र, खरी लढत शिवसेना आणि राष्ट्रवादीतच झाली होती. या वेळी महाराष्ट नवनिर्माण सेना मैदानात नसला तरी, वंचित बहुजन आघाडी मैदानात आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कोणाची मते खाते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.