Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) गंभीर संकटात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना नांदेड (Nanded) जिल्ह्यातील  1,604 पैकी  तब्बल 1,179 गावं कोरोनामुक्त झाली आहेत. विशेष म्हणजे 271 गावांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (Ruturaj Deshmukh, 21 वर्षीय सरपंच ने सोलापूरच्या घाटणे गावाला 'बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह' मॉडेलने केले कोरोनामुक्त)

नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत 90000 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 1800 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नांदेड जिल्ह्यात 16 तहसीलमध्ये एकूण 1,179 गावं आहेत. त्यापैकी  1,179  गावं कोरोनामुक्त झाली आहेत आणि 4 जूनपर्यंत यामध्ये एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. तर 271 गावांमध्ये कोरोनाची दुसरी लाट पोहचलीच नाही.

नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी याचे सर्व श्रेय टीम वर्कला दिले आहे. जिल्हा ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य, अंगणवाडी सेवक, आरोग्य सेवक या सर्वांनी कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यासाठी एकत्रितपणे काम केले. त्याचबरोबर गावकऱ्यांनी देखील नियमांचे पालन करुन सहकार्य केले, असे त्या म्हणाल्या. परंतु, संकट अद्याप संपलेले नसल्यामुळे गावकऱ्यांना सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. (काय सांगता! 'कोरोनामुक्त' असलेल्या गावाला मिळणार मालामाल होण्याची संधी, जाणून घ्या स्पर्धेची पूर्ण माहिती)

कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेदरम्यान यवतमाळ जिल्हा आणि तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्याजवळील भागांमध्ये संसर्ग अधिक असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे 271 गावांपैकी 77 गावांमध्ये आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही.

किंनवत व्यतिरिक्त हाडगावमधील 42 गावं, गंधार मधील 39, लोहामधील 22, भोकरमधील 16, मुडखेड मधील 15, माहुरमधील 17, नांदेडमधील 12, हिमायत नगरमधील 9, देगरुलमधील 7, आंध्रपूर, धर्मदाबाद आणि उमरी  मधील 4, मुखेड मधील 2 आणि बिलोली मधील एक गाव कोरोनापासून मुक्त असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यासोबत काही गावांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांवरील उपचार याद्वारे एक उदाहरण घालून दिले आहे. नायगांव तालुक्यातील शेळगावमध्ये 100 टक्के लसीकरण पार पाडले असून भोकर तालुक्यातील भोसी गावात सर्व रुग्णांवर स्थानिक पातळीवरच यशस्वीपणे उपचार करण्यात आले आहेत.