नाणार प्रकल्प (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Nanar Refinery Project: गेली अनेक महिने नाणार प्रकल्प कोकण पट्ट्यातील रत्नागिरी (Ratnagiri) येथे उभारण्यात येणार होता. यावरुन सरकार आणि कोकणवासीयांमध्ये जोरदार वाद सुरु होता. या प्रकरणी कोकणवासीयांनी नाणार हटावच्या घोषणा दिल्या होता. कोकणवासीयांच्या या संघर्षाल यशस्वी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. तसेच नाणार प्रकल्प हा आता रायगड (Raigad) मध्ये हलविण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.

कोकणवासीयांनी नाणारमध्ये उभ्या राहणाऱ्या प्रस्तावित रिफायनरीला उभारण्यास जोरदार विरोध केला होता.तसेच शिवसेना पक्षाने ही नाणार प्रकल्पाविरोधात सरकारवर टीका केली होती. त्यानंर ही या प्रकरणी खूप वाद झाले होते. त्यामुळे आता नाणार रागडात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकल्पासाठी रायगडात योग्य जमिनीचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे. नाणारसाठी रायगड जिल्ह्यातील रोहा ते माणगाव दरम्यान जमिनीची पाहणी करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या सहा अधिकाऱ्यांची जागेची निवड करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

तर राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्ससाठी रोह्यातील चमेला येथे एमआयडीसीने जागा संपादित केली आहे. तसेच एमआयडीसीला लागून शेकडो एकर जमिनीनर नाणार प्रकल्प उभारणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे नाणार हा प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण असल्याचे सांगितले जात आहे.