नाणार प्रकल्प (Nanar Project) या मुद्द्यावरून महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या अनेक दिवसांपासून राजकारण सुरु आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने याआधी नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी नाणारमधील शिवसैनिकांनी नाणार प्रकल्पला समर्थन दिले असून पैसे कामावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे, असा आरोप नारायण राणे यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आले असताना प्रसारमाध्यांशी बोलताना केला आहे. तसेच नाणार प्रकल्पाबाबत आपली भूमिका व्यक्त करताना नारायण यांनी जनता ज्या दिशेने जाईल, त्याच दिशेने आम्ही जाणार असल्याचे म्हटले आहे.
राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. चार दिवसांपूर्वी या किल्ल्याची तटबंदी अतिवृष्टीमुळे कोसळली होती. या पाहणी दौऱ्यात राणेंसोबत त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे हेही सोबत होते. पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी नाणारमधील काही लोकांनी नाणार प्रकल्पाला समर्थन दिले. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे. बोलण्यात काय बदल करतील हे सांगू शकत नाही. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे. हे देखील वाचा- Best Performing Chief Minister In India: लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातव्या स्थानी; पाहा संपूर्ण यादी
तसेच बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी नारायण राणे यांना अनेक प्रश्न विचारले गेले. दरम्यान, सुशांतची माजी मॅनेजर दिशा सानियनच्या आत्महत्येचा तपास का केला नाही? माझ्या माहितीनुसार, तिचा बलात्कार करून तिचीही हत्या करण्यात आली आहे. तिच्या गुप्तांगावर अनेक जखमा आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास करायला हवा आहे, असेही नारायण राणे म्हणाले आहेत. नारायण राणे यांच्या वक्तव्यावर अद्याप महाविकास आघाडीतील कोणत्याही नेत्यांची प्रतिक्रिया आलेली नाही.