Chief Minister Uddhav Thackeray's (PC - Twitter)

MOOD OF THE NATION AUGUST 2020: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांची मुख्यमंत्री अधिक पसंती मिळू लागली असून दिवसेंदिवस त्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. कोरोना संकट काळात त्यांनी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांना पुन्हा एकदा स्थान मिळवता आले आहे. इंडिया टूडेने नुकताच मुड ऑफ द नेशन, असे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात देशातील मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार, देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांनी सातवे स्थान पटकावले आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यांना 24 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पसंती दर्शवली आहे.

इंडिया टूडेने केलेल्या सर्वेक्षणात भाजप आणि काँग्रेस शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता जास्त दिसून आली आहे. सर्वेक्षणातील पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री बिगर भाजप व काँग्रेसशासित राज्यांचे आहेत. दुसऱ्यांदा दिल्लीची धुरा सांभाळणारे अरविंद केजरीवाल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री मंत्री जगनमोहन रेड्डी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या यादीत चौथ्या क्रमांकावर आहेत. हे देखील वाचा- सीएम उद्धव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट; नवी मुंबई येथील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे-

- योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश, 24 टक्के)

- अरविंद केजरीवाल (दिल्ली,15 टक्के)

- जगनमोहन रेड्डी (आंध्रप्रदेश, 11 टक्के)

- ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल, 9 टक्के)

- अन्य- (8 टक्के)

- नितीश कुमार (बिहार, 7 टक्के)

- उद्धव ठाकरे (महाराष्ट्र, 7 टक्के)

- नवीन पटनायक (ओडिशा, 6 टक्के)

- के चंद्रशेखर राव (तेलंगणा, 3 टक्के)

- अशोक गेहलोत (राजस्थान, 2 टक्के)

- बी एस येडुयुरप्पा (कर्नाटक, 2 टक्के)

- भुपेस बघेल (छत्तीसगड, 2 टक्के)

- शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश, 2 टक्के)

- विजय रुपानी (गुजरात, 2 टक्के)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ज्यामुळे संपूर्ण राज्याभरातून त्यांचे कौतूक केले जात आहे. तसेच इंडिया टूडेने केलेल्या सर्वेक्षणाचा अनेकांना प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आहे.