उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झालेल्या Nagpur-Hyderabad Charter Plane चे मुंबई विमातळावर सुरक्षित लँडिंग (Watch Video)
Flight | Representational Image | (Photo Credits: Twitter)

तांत्रिक बिघाडामुळे मुंबईच्या (Mumbai) दिशेने वळवण्यात आलेल्या नागपूर-हैदराबाद (Nagpur to Hyderabad) चार्टर प्लेनचे (aircraft VT-JIL) मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे लँडिंग झाले आहे. रिपोर्टनुसार, नागपूर विमातळावरील (Nagpur Airport) रनवे नंबर 32 (Runway Number 32) वरुन उड्डाण घेत असताना बीक्राफ्ट चार्टर विमानाचे  (Beechcraft Charter Flight) चाक प्लेनपासून वेगळं झालं. अधिकाऱ्यांनी याची माहिती वैमानिकाला दिली. त्यानंतर पायलट लँडिंग गिअरचा वापर न करता बेली लँडिंगचा (Belly Landing) प्रयत्न करीत होता. दरम्यान, ते विमान मुंबई विमानतळावर वळवण्यात आले आणि मुंबई एअरपोर्टवर पूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या एअर अम्ब्युलन्स मध्ये रुग्ण आणि डॉक्टर होते. मुंबई विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर विमानातील रुग्णाला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, हे विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतरचा व्हिडिओ समोर आला आहे.

पहा व्हिडिओ:

केंद्रीय नागरी उड्डान मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्विटद्वारे या विमानाचे फोटो शेअर केले असून विमानातील सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "एका रुग्णाला नेणाऱ्या जेट सर्व्ह अ‍ॅम्ब्युलन्सचे चाक नागपूरहून टेकऑफदरम्यान वेगळे झाले. मात्र यादरम्यान प्रसंगावधान दाखवत कॅप्टन केसरी सिंह यांनी विमानाचे बेली लँडिंग घडवून आणले. मुंबई एअरपोर्टवर निर्माण केलेल्या foam carpeting वर हे विमान सुरक्षित उतरण्यात आले."

(धक्कादायक! कॅनडा मधील क्युबेक शहरातील महामार्गावर एका छोट्या विमानाने केले 'Emergency Landing', पाहा काळजाचा ठोका चुकवणारे हे दृश्य, Watch Video)

नागपूर-हैदराबाद विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगची पूर्वसूचना मुंबई विमातळाला देण्यात आल्याने एअरपोर्टवर लँडिंगपूर्वीच अग्निशमन दल आणि अम्बुलन्स उपस्थित होते. दरम्यान, विमानाच्या डाव्या rear wheel ची समस्या उद्भवली असल्याचे सुत्रांनी सांगितले.