तणावातून बाहेर निघण्याच्या नावाखाली एका मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर तरुणीला दारु पाजून तिच्यावर बलात्कार केला गेला. या प्रकरणी पोलिसांनी रोमियो गोडबोले नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मुख्य बाब म्हणजे आरोपी हा पीडित तरुणीचा बायफ्रेंडचा मित्र असल्याचे बोलले जात आहे.(Sangli Leopard: सांगली शहरातील राजवाडा परिसरात बिबट्या दिसला; विभागाची धावपळ, नागरिकांची भीतीने उडाली गाळण)
नागपूर मधील अजनी पोलीस स्थानकाच्या हद्दीतच ही बलात्काराची घटना समोर आली आहे. पीडिताने पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नैराश्य आणि तणावातून बाहेर निघण्यासाठी मदत करतो सांगत आरोपीने पीडितेसोबत आपली जवळीक अधिक वाढवली. त्यानंतरच तिच्यावर अत्याचार करण्यास त्याने सुरुवात केली.
पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार, ते दोघे एकमेकांना उत्तमपणे ओळखतात. पीडिता नागपूरमध्ये शिक्षणासाठी आली होती. त्यासाठी तिने अजनी पोलीस स्थानकाच्या हद्दीतच एक भाड्यावर घर घेत तेथे राहत होती. पीडिता तणावाखाली गेली होती. याच दरम्यान आरोपी तिला आपल्या जाळ्यात फसवू पाहत होता.(बारामती मध्ये पोलिस कर्मचारी पोपट दराडे यांनी विषारी औषध घेऊन संपवले जीवन)
आरोपीने मंगळवारी तरुणीला दारू पाजली आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पीडितेची मानसिक स्थिती बिघडली आहे. तरुणीला जेव्हा शुद्ध आली त्यावेळी तिने तातडीने पोलिसात धाव घेत आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.