महाराष्ट्रामध्ये दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर आता अनेक सरकारी कर्मचार्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरू झालं आहे. नुकतीच बारामती तालुका पोलिस ठाण्यामध्ये असलेल्या एका पोलिस कर्मचार्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या पोलिस कर्मचार्याचं नाव पोपट दराडे आहे. त्यांच्या अतमहत्येचं कारण समजू शकले नसले तरीही घरगुती कलह त्यामागील एक कारण असल्याचं बोललं जात आहे. पोपट दराडे यांना 3 दिवसांपासून खोकल्याचा त्रास होता. त्यांनी खोकल्याचे औषध समजून चुकून विषारी औषध प्राशन घेतल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. Deepali Chavan Suicide Case: मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रदेश संचालक एमएस रेड्डी निलंबीत.
दीपाली चव्हाणच्या आत्महत्येनंतर रत्नागिरीच्या दापोली येथील मुरूड मध्ये पोस्ट मास्टर म्हणून काम करणार्या पूर्वी तुरे यांनी देखील पोस्ट कार्यालयामध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती तर सातारामधील पाटण मध्ये कोयना नगर मध्ये शासकीय निवासस्थानामध्ये जलसंपदा विभागात काम करणार्या बंडू कुंभार यांनी देखील आत्महत्या केल्याचं समोर आले आहे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्येनंतर राज्यभर खळबळ पसरली आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं तिने लिहलेल्या पत्रामध्ये समोर आलं आहे. दरम्यान आज तिने आत्महत्येला कारणीभूत असलेल्या मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांना निलंबित केले. दीपाली यांनी एमएस रेड्डी यांच्यावर छळ केल्याचा आरोप करत आत्महत्या केली आहे.