धक्कादायक! YouTube वर पाहिला आत्महत्येचा व्हिडीओ; गळफास लावून तशीच कृती करताना अल्पवयीन मुलीचा मृत्यू
Representational Image (Photo Credits: Pixabay)

आजकाल लहान मुले सोशल मिडीयाच्या (Social Media) इतकी आहारी गेली आहेत की, याचे दुष्परिणाम थेट त्यांच्या आयुष्यावर होत आहेत. तरुणाई पब्जीच्या विळख्यात असताना आता युट्यूब (Youtube) वरील आत्महत्येचा व्हिडीओ पाहून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिखा राठोड असं मृत मुलीचे नाव असून ती फक्त बारा वर्षांची होती. स्वतःला गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे. नागपूरच्या (Nagpur) तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हंसापुरी परिसरात ही घटना घडली आहे.

पोलिसांना हा घटनेची माहिती मिळताच त्यांनी जेव्हा चौकशी सुरु केली तेव्हा, मृत्युपूर्वी ही मुलगी आपल्या बहिणींसह आत्महत्येचा व्हिडीओ पाहत असल्याचे समोर आले आहे. हा व्हिडीओ तिने स्वतः पाहून आपल्या आईला देखील दाखवला होता. त्या व्हिडीओमध्ये जे दाखवले ते पाहून एक उत्सुकता म्हणून तिने आपल्या खोलीत गेल्यावर नायलॉनच्या दोरीने स्वतःला फाशी लावून बघितली. दरम्यान, दोरी गळ्यात टाकल्यावर स्टूलवरून तिचा पाय घसरला आणि तिच्या गळ्याला फास बसला. पोलिसांनी आकस्मित मृत्यू अशी या घटनेची नोंद केली आहे. (हेही वाचा: ओल्या विजेच्या खांबाला स्पर्श केल्याने युवतीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांनी केली अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी (Video))

दरम्यान, पबजी मोबाईल गेममुळे होणाऱ्या दुर्घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तेलंगणा (Telangana) येथील 20 वर्षीय मुलाचा गेम खेळताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरुण सातत्याने 45 दिवस पबजी गेम खेळत होता. त्यामुळे मानेचे गंभीर दुखणे उद्भवले आणि त्याला हैद्राबादमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.