धक्कादायक! ओल्या विजेच्या खांबाला स्पर्श केल्याने युवतीचा जागीच मृत्यू; कुटुंबीयांनी केली अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी (Video)
विजेच्या खांबाला स्पर्श केल्याने महिलेचा मृत्यू (Photo Credit : Twitter)

पावसाळ्यात आपण जितकी घरांची, कपड्यांची, त्वचेची काळजी घेतो तितकीच सतर्कताही बाळगणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वेजेचे खांब (Electric Pole), तारा या जीवघेण्या ठरू शकतात याबाबत जनजागृती केली जाते. मात्र तरी या गोष्टीकडे कानाडोळा केल्याने जीव गमावण्याची वेळ सुरत येथील महिलेवर आली आहे. सुरत (Surat) येथील कारगिल चौक (Kargil Chowk) जवळील ओल्या विजेच्या खांबाला स्पर्श केल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  काजल छावडा असे या मुलीचे नाव असून ती फक्त 20 वर्षांची आहे.

परिसरात दुपारी पाऊस पडला होता, पाऊस कमी झाल्यावर काजल तिच्या घरी जाण्यासाठी निघाली होती. रस्त्यात खड्ड्यांमुळे पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढत जात असताना चुकून तिचा हात भिजलेल्या विजेच्या खांबाला लागतो, त्यानंतर शॉक लागून लगेच ती खाली पडते. आजूबाजूचे लोक जमा होतात व तिला SMIMER हॉस्पिटल मध्ये नेले जाते, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू होतो. खांबाला हात चीताकाल्याने तिला तो सोडवता येत नाही. हे सर्व थरारक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. (हेही वाचा: पावसाळ्यातील सर्वात मोठी समस्या, विजेच्या धक्क्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी करा हे उपाय)

या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली असून, लोकांनी दक्षिण गुजरात विज कंपनी लिमिटेड (DGVCL) च्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी या घटनेची तपासणी करून, आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आपल्या घरातील विजेच्या तर आणि स्विचेस याची काळजी घेण्याबद्दल सांगितले आहे.