My Family My Responsibility: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह कुटुंबीयांची  'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणी
CM Uddhav Thackeray |

राज्यातील कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 'माजे कुटुंब माझी जबाबदारी' (My Family – My Responsibility) ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेंतर्गत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या कुटुंबासह आरोग्य तपासणी करुन घेतली. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेंतर्गत तपासणी करण्यासाठी मुंबई महापालिका आरोग्य (BMC Health Department) विभागाचे पथक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरी मंगळवारी (6 ऑक्टोबर) पोहोचले. त्यांनी वांद्रे पूर्व परिसरातील 'मातोश्री' या खासगी निवासस्तानी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांची तपासणी केली. या पथकाने या वेळी मुख्यमंत्र्यांच्या घरातील सर्वांची ऑक्सिजन पातळी, तापमान तपासले. त्यासोबतच आरोग्याची माहितीही भरून घेतली. मुख्यमंत्र्यांनीही त्यानंतर या पथकाशी चर्चा केली. तसेच या मोहिमेची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते याबाबत माहिती घेतली. मुख्यंत्र्यांनी या वेळी काही सूचनाही केल्या.

माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचवून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि राज्य सरकार आग्रही आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रशानालाही अवाहन केले आहे की, ही योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात यावेत. जेणेकरुन कोरोना व्हायरस संक्रमीत शेवटच्या रुग्णापर्यंत पोहोचण्यास यश येईल. (हेही वाचा, No Mask, No Entry: मुंबईमध्ये मास्क नसल्यास सार्वजनिक परिवहन बसेस, टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवेश नाही- BMC)

दरम्यान, मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमद्ये 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम वेगाने कार्यरत आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत तब्बल 7 लाख घरांमधून 24 लाख नागरिकांच्या आरोग्याची तपासणी झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आतापर्यंत जवळपास 35 लाख घरांपैकी सुमारे 19.83% घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांच्या शरीरातील ऑक्सीजनची पातळी तपासली जाते आहे. तसेच, नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्गाची लक्षणे दिसतात का हेही तपासले जात आहे.

संपूर्ण राज्यात 'माझे कुटुंब माझी जबाबादारी' ही मोहीम 15 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत राबवली जाणार आहे. या मोहिमेनुसार नागरिकांच्या घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेतली जाते. यात वय, लिंग यासह नागरिकांला मधुमेह, रक्तदाब यांसारख्या काही व्याधी आहेत का? याचीही माहिती घेतली जात आहे.