Snake | image only representative purpose (Photo credit: Pixabay)

मुंबई शहरातील धारावी डेपो (Dharavi Depot) परिसरात असलेल्या सोनेरी चाळ (Soneri Chawl) येथे राहणाऱ्या एका मायलेकींनी दाखवलेले धाडस आणि प्रसंगावधान पाहून सायन हॉस्पिटल (Sion Hospital) येथील डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला. सुल्ताना खान (वय 34 वर्षे आणि तहसीन खान (वय 18 वर्षे) असे या मायलेकींची नावे आहेत. घरात सकाळच्या वेळी नाश्ता करत असताना रविवारी सकाळी 11 च्या सुमारास या मायलेकींना सर्पदंश (Snake Bite) झाला. त्यानंतर या मायलेकी दंश केलेल्या सापासह रुग्णालयात पोहोचल्या.

साप पाहून गर्भगळीत झालेल्या डॉक्टरांनी कसेबसे स्वत:ला सावरले आणि साप घेऊन दवाखन्यात का आलात असे या मायलेकींना विचारले. यावर या या मायलेकींनी आपल्या एका नातेवाकावर उद्भवलेला सर्पदंशाचाया प्रसंगही या मायलेकींनी डॉक्टरांना कथन केला. तसेच, ' हा साप कोणत्या जातीचा आहे हे ओळखून योग्य उपचार करण्यासाठी डॉक्टरांना मदत होईल म्हणूनच आपण हा साप घेऊन रुग्णालयात पोहोचले', असे उत्तर या मायलेकींनी दिले.

दरम्यान, डॉ. प्रमोद इंगोले यांनी सर्पदंश झालेल्या या मायलेकींवर उपचार केले. तसेच, सर्पदंश झाल्यावर तातडीने रुग्णालयात आलात हे बरे झाले. परंतू, उपचार करुन घेण्यासाठी सोबत दंश केलेला साप घेऊन येण्याची काहीच आवश्यकता नव्हती असेही सांगितले.

प्रसारमाध्यांनी (मटा) दिलेल्या वृत्तानुसार, सर्पदंशपीडित सुल्ताना खान यांनी सांगितले की, घरात नाश्ता करत असताना सापाने पहिल्यांदा मुलीला दंश केला. तो मुलीला दंश करत असल्याचे माझ्या ध्यानात येताच मी त्याला पकडले. पण त्याने मलाही दंश केला. पण, मी त्याला सोडले नाही. जिवंत साप पकडून मी थेट टॅक्सी केली आणि सायन हॉस्पीटल गाठले. दंश केलेल्या सापाची प्रजात पाहून उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे जावे यासाठीच आपण साप घेऊन रुग्णालयात हजर झाल्याचे, सुल्ताना यांनी सांगितले. (हेही वाचा, अहमदनगर: हॉस्पिटलमध्ये रूग्णाच्या शर्टात विषारी साप; सर्पमित्रांच्या शक्कलीने सापाची सुरक्षित सुटका करून वाचवले प्राण (Watch Video))

दरम्यान, कोणत्याही सापाने दंश केला तरी त्यावरील उपचार पद्धती ही समानच असते. त्यामुळे थेट रुग्णालयात पोहोचून शक्य तितक्या लवकरच उपचार घेण्याऐवजी साप पकडण्यात कोणी उर्जा खर्च करु नये. असे सांगत या मायलेकींवर उपचार केले. या मायलेकींना प्रत्येकी चार अशी एकूण आठ इंजेक्शन देण्यात आली आहे. दोघींचीही प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, डॉक्टरांनी प्राणी तज्ज्ञांना तत्काळ बोलावले आणि साप त्यांच्या हवाली केला. हा साप घोणस जातीचा असल्याचे सर्पतज्ञांनी सांगितले.