वाहतूक खरेदी केल्यानंतर चालकाकडे वाहन परवाना असणे अनिवार्य आहे. कारण वाहन परवानानुसार चालकाचा गाडी क्रमांकासह अन्य माहिती सुद्धा त्यावर देण्यात येते. त्यामुळे वाहतूकीचा कोणताही नियम मोडल्यानंतर प्रथम वाहतूक पोलिसांकडून चालकाकडे वाहन परवाना आहे की नाही याची तपासणी केली जाते. मात्र आता वाहन परवाना काढण्यासाठी नवा पर्याय आरटीओ कडून सुचवण्यात आला आहे. वाहन चालकांना परवाना काढण्यासाठी आता शपथ घ्यावी लागणार आहे. त्यासाठी वाहतूकीच्या नियमांसंदर्भात नियम न मोडण्याबाबत शपथ घेण्यासाठीचे मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत. त्यानुसार चालकाने शपथ घेण्यासाठी हे मुद्दे जरुर लक्षात ठेवावे.
-मी शपथ घेतो की, मी एक सुजाण नागरिक असून रस्ते आणि वाहतूक संदर्भातील सर्व नियामांचे पालन करीन.
-मी शपथ घेतो की, दुचाकी चालवताना मी स्वत: आणि माझ्या पाठी बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट घालण्याची सक्ती करणार आहे.
-मी गाडी चालवताना मोबाईल किंवा मेसेज करणे टाळीन.
-गाडी चालवताना एखाद्या गाडीला माझ्याविरोधात संपात व्यक्त करेल असे वागणार नाही.
-मी कधीच दारु पिऊन गाडी चालवणार नाही.
-मी कधीच गाडी चालवताना लेन कट करणार नाही.
वाहतूक परवाना बाबत घ्यावी लागणारी शपथ ही सर्व आरटीओमध्ये येत्या 1 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार काही आरटीओकडून या पर्यायाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तर वाहनचालकाला परवाना मिळवण्यासाठी देण्यात येणाऱ्या टेस्टपूर्वी ही शपथ घ्यायची असल्याचे आरटीओच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर प्रत्येक वर्षाला महाराष्ट्रात 25 लाख लर्निंग लायन्स आणि 19 लाख परमन्ट लायन्स काढले जातात. मात्र जर एखाद्या चालकाने शपथ घेण्यास नकार दिल्यास त्याला परवाना दिला जाणार नाही आहे. तर परवाना मिळण्यापूर्वी शपथ घेण्याचा पर्याय हा लोकांमध्ये वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कोणत्याच वाहन चालकाला परवानासाठी शपथ घेणे मान्य नसेल अशी अपेक्षा केली जात आहे.