Mumbai University IDOL Online Exam: तांत्रिक बिघाडामुळे आज परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा Exam घेतली जाणार; मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रशासनाचे स्पष्टीकरण
Mumbai University (Photo Credits: mu.ac.in)

Mumbai University IDOL Online Exam: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शैक्षणिक वर्ष अद्याप सुरु झालेले नाही. मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी घेतल्या जाणार याबद्दल काही दिवसांपूर्वीच निर्णय घेण्यात आला. त्यानंतर  मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या आयडॉलच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र नेहमीप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी उद्भवल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. पण आता परीक्षेच्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही त्यांची पुन्हा एक्झाम होणार आहे. याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल प्रशासनीने स्पष्टीकरण दिले आहे.(Mumbai University Distance Learning Admissions 2020 Update: मुंबई विद्यापीठाच्या Idol च्या ऑनलाईन प्रवेशाची तारीख 6 ऑक्टोबर पर्यंत वाढवली)

सध्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा पार पडत असून विद्यार्थी त्यासाठी स्मार्टफोन, लॅपटॉपचा वापर करत आहेत. मात्र आजपासून सुरु झालेल्या परीक्षेची लिंक काही जणांना नियोजित वेळेनंतर मिळाल्याने त्यांना लॉग इन करणे कठीण झाले. त्यामुळे त्यांना परीक्षेचा आजचा पेपर देताना काही वेळानंतर लॉगिन होऊन सुद्धा तांत्रिक अडचणींमुळे तो देता आला नाही. याच कारणास्तव आता पेपर न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. पेपर वेळी विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणींबद्दल तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांवर फोन करुन तेथे फॉर्म भरणे किंवा ईमेल द्वारे त्याचे निवारण करण्याच्या सुद्धा सुचना दिल्या आहेत.(Nagpur University's Online Exams Postponed: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलल्या)

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली नाही त्यांची पुन्हा एक्झाम कधी होणार याबद्दल लवकरच कळवले जाईल असे सांगण्यात आले आहे. तर कोरोनाच्या महासंकटामुळे परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अशक्य असल्याच्या स्थितीमुळेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.