Mumbai University (Photo Credits- Facebook)

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) Institute of Distance and Open Learning मध्ये प्रवेशाची प्रक्रीया देखील 6 ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता 6 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश अर्ज भरु शकतात. यात B.A., B.Com, B.Sc. IT आणि B.Sc.कॅम्प्युटर सायन्स तसंच M.A. Part 2, M.Com Part 2, M.Sc. Part 2 आणि MCA या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तसंच PGDFM, PGDORM या अभ्यासक्रमांचाही अंतर्भाव आहे. दरम्यान ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी http://idoloa.digitaluniversity.ac/ या वेबसाईटवर रजिस्टर करणे आवश्यक आहे.

सर्व अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती तुम्हाला https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या वेबसाईटवर उपलब्ध होईल. IDOL चे रजिस्ट्रेशन सेंटर्स चर्चगेट, कल्याण, ठाणे, रत्नागिरी येथे आहेत. दरम्यान ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेदरम्यान टेक्निकल प्रॉब्लेम आल्यास 02268537177 या क्रमांकावर संपर्क करा आणि पेमेंट करताना काही समस्या उद्भल्यास customerservice@airpay.co.in या मेल करा.

ANI Tweet:

दरम्यान, IDOL च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. IDOL च्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार असून विद्यार्थ्यांना एका तासांत 100 प्रश्न सोडवायचे आहेत. पदवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातील परीक्षा नोव्हेंबर 2020 मध्ये घेण्यात येतील. IDOL ने पुरवलेल्या अभ्यासक्रमाचे साहित्य (Study Material) यावर आधारीत प्रश्न परीक्षेत विचारण्यात येणार आहेत. नियमित परीक्षा 1 ते 17 ऑक्टोबर दरम्यान होतील. तर केटी परीक्षा 25 सप्टेंबर पासून सुरु होणार आहेत. या सर्व परीक्षा मल्टिपल चॉईस पद्धतीने होतील.

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे 10 वी, 12 वी सह पदवी परीक्षांची निकाल प्रक्रीया लांबली. परीणामी पुढील वर्षांची प्रवेश प्रक्रीयाही उशीराने सुरु झाली.