प्रतिकात्मक फोटो ( फोटो सौजन्य- फेसबुक )

मुंबई वाहतूक पोलिसांकडून  (Mumbai Traffic Police) ज्या वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम मोडल्यानंतर त्यांना पाठवण्यात आलेले ई-चलन न भरलेल्यांच्या विरोधात एक मोठे पाऊल उचचले आहे. त्यानुसार वाहतुक पोलिसांनी ई-चलन न भरलेल्या जवळपास 2 हजार जणांचे वाहन परवाने आरटीओकडे रद्द करण्यासाठी पाठवले आहेत. त्याचसोबत वाहन चालकाने त्यांचा वाहन परवाना का रद्द होऊ नये याबद्दल ही स्पष्टीकरण द्यावे असे म्हटले आहे.(खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर, होईल 25,000 रुपये दंड)

सद्यच्या घडीला ई-चलन प्राप्त करण्याचा रेट 30 टक्के आहे. मात्र पुढील सहा महिन्यात तो 50 टक्के असू शकतो असे ट्राफिक सहआयुक्त यशस्वी यादव यांनी म्हटले आहे. राज्याचे वाहतूक आयुक्त अविनाशा धानके यांनी असे म्हटले आहे की, जर वाहन धारकाने तीन किंवा त्याहून अधिक ई-चलनाची रक्कम भरली नसल्यास त्याता वाहतूकीचा परवाना आरटीओकडून तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी रद्द केला जाऊ शकतो. मात्र काही गंभीर प्रकरणात वाहन परवाना दीर्घ काळासाठी रद्द केला जाऊ शकतो.

त्याचसोबत वाहतूक मालकाशिवाय गाडी चालवणाऱ्या एखादा व्यक्ती नियम मोडू शकतो असे ही धानके यांनी म्हटले. पण यासंदर्भात नोटीस थेट मालकालचा पाठवली जाते. ऐवढेच नाही तर काहीजण खोटा पत्ता किंवा चुकीचा मोबाईल क्रमांक सुद्धा देतात. अशावेळी ई-चलन पाठवणे कठीण होते असे आरटीओ अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

राज्यातील वाहतूक विभागाकडून लवकरच कॉल सेंटर सुरु करण्यात येणार आहे. जेणेकरुन या कॉल सेंटरच्या माध्यमातून वाहन चालकांना त्यांनी ई-चलनाची रक्कम भरली नसल्याचे सांगितले जाणार आहे. तसेच अधिक चलनाची रक्कम न भरलेल्या व्यक्तीच्या घरी पोलीस येणार असून त्यांना शांतपणे ई-चलन भरण्यास सांगणार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या नावे जर ई-चलन आल्यास तो त्यापासून पळ ही काढू शकत नाही.(मुंबई वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूल, महामार्गावर वाहनांच्या वेगासाठी बनवले नवे नियम, जाणून घ्या सविस्तर)

यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये एखाद्यावेळी वाहन परवाना जप्त केल्यानंतर वाहनाच्या मालकाकडून पोलिसांच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली जायची. त्यामध्ये ते असे कारण द्यायचे की, वाहन परवाना हरवला आहे किंवा नव्या वाहन परवानासाठी अर्ज केला आहे. मात्र आता सर्व डेटा हा सेन्ट्रलाइज्ड सर्वरवर अपलोड केला असून तो आरटीओसह पोलीस सुद्धा एक्सेस करु शकतात. त्यानुसार वाहनधारकानाचा परवाना कायमचा रद्द करायचा की नाही याबद्दल पोलीस तपास करणार आहेत. त्याचसोबत त्या वाहनधारकावर किती रुपयांचा दंड आहे हे सुद्ध तपासून पाहिले जाणार आहे.