Mumbai Local trains. Image Used For Representational Purpose Only.(Photo Credits: ANI)

मुंबई ची लाईफ लाईन असणारी मुंबई लोकल अजून सामान्यांसाठी पूर्णपणे खुली झालेली नाही मात्र अपवादात्मक स्थितीमध्ये आता काहींना परवानगी दिली जात आहे. दरम्यान येत्या रविवारी, 8 नोव्हेंबर दिवशी UPSC CDS 2020-21 परीक्षा होणार आहे. या परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी आणि घरी परतण्यासाठी रेल्वे प्रवास करू शकतात. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून हिरवा कंदील दिला आहे. दरम्यान त्यांना हा प्रवास करण्यासाठी तिकीटासोबत त्यांचे वैध अ‍ॅडमीट कार्ड म्हणजेच प्रवेशपत्र सोबत ठेवणं अनिवार्य आहे. Colour-Coded E-Pass: मुंबई लोकल मध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी 'कलर कोडेड ई पास' यंत्रणेचा होतोय विचार; जाणून घ्या काय आहे हा पर्याय!

आज पश्चिम रेल्वे कडून ट्वीट करत ही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या रेल्वे प्रवासादरम्यानही सोशल डिस्टंसिंग पाळा, मास्क वापरा तसेच स्थानकांवर रेल्वेकडून घालण्यात आलेल्या नियमावलीचं पालन करा असं आवाहन करण्यात आलं आहे.

रेल्वेचं ट्वीट

दरम्यान येत्या काही दिवसांत गर्दीचं नियोजन करत सर्वसामान्यांसाठी आता मुंबई लोकल खुली करण्यावर विचार सुरू आहे. राज्यसरकारने तसा प्रस्ताव पाठवला आहे. सध्याच्या घडीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, बॅंक, वकील, सुरक्षा रक्षक यांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे. तर सामान्य महिला सकाळी 11 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते शेवटची लोकल असा प्र्वास करू शकणार आहेत.