
Mumbai Temperature Update: मुंबईतील तापमानात मोठी घट झाली असून मुंबईकरांना आता हुडहुडी भरली आहे. शहरात यंदाच्या मोसमातील सर्वांत कमी तापमानाची नोंद करण्यात आली. मुंबई पार 13.8 अंश सेल्सिअसने खाली गेला. IMD रीडिंग रविवारी 26.2 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने कमाल (दिवसाच्या) तापमानातही लक्षणीय घट झाली आहे, जे सामान्य तापमानापेक्षा पाच अंश कमी आहे. या हिवाळ्यात आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान 25 डिसेंबर रोजी 15 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गेल्या आठवडाभरात मुंबईत दिवसाचे तापमान 30 अंशांच्या वर तर रात्रीचा पारा 15 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.
कुलाबा येथील IMD च्या कोस्टल स्टेशनवर रात्रीचे तापमान 16.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर दिवसाचे तापमान 27.2 अंश होते. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, आयएमडीच्या अधिकाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला होता की मुंबईला या हिवाळ्याच्या हंगामातील सर्वात थंड टप्पा 15 ते 17 जानेवारी दरम्यान अनुभवायला मिळेल. IMD मुंबईच्या शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ज्ञ सुषमा नायर यांनी सांगितले की, उत्तर भारतातील थंडीमुळे मुंबईतही थंडीचा कडाका जाणवेल. (हेही वाचा -Pune Temperature Update: पुण्यात किमान तापमान दुहेरी आकड्यांवर पोहोचले, तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता)
सध्या उत्तरेकडून वारे वाहत असून आर्द्रताही खूप कमी आहे. परिणामी थंड आणि कोरडे हवामान अनुभवायला मिळेल. 17 जानेवारीपर्यंत शहरात थंड हवामान असेल, त्यानंतर तापमानात पुन्हा किरकोळ वाढ होण्याची अपेक्षा असल्याने मुंबई हळूहळू उष्ण होऊ शकते, असं नायर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे हवामान तज्ज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञ महेश पलावत म्हणाले की, उत्तर भारतातून थेट वारे वाहत असल्याने त्याचा परिणाम मुंबईवर होत आहे. “सध्या, भारताच्या उत्तर भागात बर्फवृष्टी होत आहे. ज्यामुळे पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भारत दररोज तापमानात घट अनुभवत आहे. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या आठवडाभरात दैनंदिन तापमान 10 अंशांच्या खाली गेले आहे. मुंबईवर थेट वाहत असलेल्या उत्तरेकडील वाऱ्यांचा हा परिणाम आहे,” असंही त्यांनी सांगितलं.