Dog Rabies | Pixabay.com

रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास मुंबई मध्ये अनेक ठिकाणी नागरिकांना होत आहे. कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबिजचा धोका देखील आहे. त्यामुळे आता या जीवघेण्या आजारापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी बीएमसी ने 'रेबिजमुक्त मुंबई' ची योजना (Mumbai Rabies Eradication Project) आखली आहे. 28 सप्टेंबर पासून लसीकरण मोहिम (Rabies Vaccination) सुरू केली जाणार आहे. रेबीज मुक्त मुंबई साठी बीएमसी (BMC) कडून अनेक ठिकाणी जनजागृतीचेही कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देखील भारताला 2030 पर्यंत रेबीजमुक्त करण्यासाठी कृती आराखडा बनवला आहे. मुंबई रेबीज निर्मुलनामध्ये वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस - मिशन रेबीज (Worldwide Veterinary Services-Mission Rabies) सोबत आता मुंबई महानगरपालिका काम करणार आहे. यासाठी 28 सप्टेंबर पासून भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहिम सुरू होणार आहे.

मुंबई मध्ये भटक्या आणि पाळीव कुत्र्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण आणि त्याबाबत तक्रारी तसेच विनंती करण्यासाठी बीएमसीच्या MyBMC app वर सुविधा देण्यात आली आहे. बीएमसी च्या 'मायबीएमसी अ‍ॅप' किंवा https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवर सोय देण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या कामाला गती देण्यासाठी काही प्राणी कल्याण संस्था देखील नियुक्त केल्या जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Rabies Death in Kerala: होमिओपॅथी महिला डॉक्टरने पाळीव कुत्र्याचा चावा लहानशी जखम समजून Rabies Infection वर उपचार टाळणं जीवावर बेतलं! 

ऑगस्ट 2024 मध्ये, BMC अधिकारी 271 शिक्षक आणि 793 नागरिकांसह 65 शाळांमधील अंदाजे 13,332 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. जागरुकता कार्यक्रम बांधकाम साइट्स आणि इतर प्रमुख समुदाय भागात देखील जाणार आहे.