केरळ च्या Mannarkkad मध्ये 46 वर्षीय होमिओपॅथी डॉक्टरचा रेबिजच्या इंफेक्शन मुळे मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, Kumaramputhur येथील या महिला डॉक्टरच्या घरी पाळलेल्या कुत्र्यानेच दोन महिन्यांपूर्वी तिचा चावा घेतल्यानंतर तिला रेबिजची लागण झाली होती. तिने ही लहानशी गोष्ट असल्याचं समजून वैद्यकीय औषध घेण्यकडे टाळाटाळ केली. मात्र काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती फारच ढासळली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिला नजिकच्या सरकारी दवाखान्या मध्ये दाखल केले.
सरकारी दवाखान्या मध्ये डॉक्टरांनी केलेल्या तपासणी मध्ये तिला रेबीजची लागण झाल्याचं निष्पन्न झाले. तातडीने तिला Thrissur च्या सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेले. दरम्यान कथित रित्या ही महिला पतीसोबत सोमवारी सकाळी हॉस्पिटलला न कळवताछ निघून गेली आणि त्याच दिवशी सकाळी 8.30 च्या सुमारास तिचं निधन झालं. Woman Dies Due to Rabies: कोल्हापुरातील 21 वर्षीय तरुणीचा रेबीजने मृत्यू; अँटी रेबीज लसीकरण कोर्स पूर्ण केल्यानंतर 3 दिवसांनी संपली मृत्यूशी झूंज .
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महिलेने मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये तिच्या प्रकृतीची तीव्रता समजून घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली होती.
रेबीज हा रोग कुत्र्यांना होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90-175 दिवसात दिसू लागतात. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो. हा प्राणघातक आजार असल्याने वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. श्वानप्रेमी लोकांनीही काळजी घेणं आवश्यक आहे. 3 महिन्यापेक्षा मोठ्या वयाच्या पाळीव कुत्र्याला दर सहा महिन्यांनी रेबीजची लस देणे आवश्यक आहे. तसेच पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देणे धोक्याचे ठरू शकते त्यामुळे त्याचीही पुरेशी काळजी घ्यावी लागते.