मुंबई लोकलमध्ये प्रवासादरम्यान गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्याने दिला बाळाला जन्म
प्रतिकात्मक फोटो | Image for representation | (Photo credits: Pixabay)

मुंबईतील (Mumbai) लोकल मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेने प्रवासादरम्यान बाळाला जन्म दिला आहे. महिला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून ठाणे (Thane) येथे जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी तिच्या पोटात अचानक दुखू लागले. परंतु प्रवासादरम्यानच तिची प्रसुती झाली आहे. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, गर्भवती महिलेने शनिवारी रेल्वे प्रवासावेळीच जन्म दिला.

रेल्वे ठाणेच्या दिशेने जाण्यासाठी निघाली असता गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरु झाल्या होत्या. तेव्हाच महिलेने चालत्या रेल्वेत मुलाला जन्म दिला. त्यानंतर महिलेला आपत्कालीन उपचारासाठी ठाणे रेल्वे स्थानकातील एका रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी महिला आणि मुलाची प्राथमिक स्वरुपात काळजी घेतली. त्यानंतर महिला आणि बाळा एका शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.(आश्चर्यम: महिलेने नॉर्मल डिलिव्हरीद्वारे दिला तब्बल 7 मुलांना जन्म; बाळ-बाळंतीण सुखरूप)

यापूर्वी सुद्धा प्रवासादरम्यान ठाणे स्थानकातच महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्याने बाळाला जन्म दिल्याची घटना घडली होती. इशरत शेख असे महिलेचे नाव असून ती आंबिवली ते कुर्ला दरम्यान प्रवास करत होती. त्याचवेळी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास मुलाला महिलेने जन्म दिला होता.