सध्या नॉर्मल डिलिव्हरीला महिला घाबरतात. त्यातही जास्तीत जास्त 4 मुलांना नॉर्मल डिलिव्हरीने जन्म दिल्याची घटना आपण ऐकली आहे. मात्र आता इराक (Iraq) मधील एका महिलेने तब्बल 7 मुलांना नॉर्मल डिलिव्हरीने जन्म दिल्याचे घटना घडली आहे. या डिलिव्हरीनंतर ही महिला आणि तिची मुले दोघेही सुखरूप आहेत. या महिलेचे वय 25 वर्षे असून, तिने 6 मुली आणि एक मुलाला जन्म दिला आहे. मध्य-पूर्व देशातील ही पहिलीच घटना आहे, यामुळे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
7 मुलांना जन्म देण्याऱ्या या महिलेच्या पतीने इतक्या मोठ्या परिवाराची कल्पनाही केली नव्हती. आता त्यांच्या परिवारामध्ये 10 लोक झाले आहेत. यासारखीच एक घटना 2013 साली लेबनानमध्ये घडली होती. इथल्या महिलेने एका वेळी 3 मुले आणि 3 मुलींना जन्म दिला होता. या मुलांना सेक्सट्यूपलेट्स असे म्हटले जाते. (हेहे वाचा : मानवी बळीसाठी तांत्रिकाची प्रशासनाकडे मागणी, प्रथम मुलाचा बळी देणार)
पोटात एका पेक्षा जास्त भ्रूण असले की जास्त मुले होण्याचे चान्सेस वाढतात. मात्र अशावेळी सर्वच्या सर्व मुले आरोग्यदायी असण्याची शक्यता कमी असते, म्हणून अशावेळी मुद्दाम भ्रूणांची संख्या कमी केली जाते.