भयंकर! मानवी बळीसाठी तांत्रिकाची प्रशासनाकडे मागणी, प्रथम मुलाचा बळी देणार
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

Patna: बिहार येथे भयंकर अशी एक घटना समोर आली आहे. येथील एका तांत्रिकाने बेगूसराय मधील अधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले. त्यामध्ये आपल्या देवतांना खुश ठेवण्यासाठी मानवी बळी देण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विचित्र मागणी पत्राद्वारे केली. या घटनेचा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच तांत्रिकाने असा दावा केला आहे की, मानवी बळी हा कोणताही अपराध नसून प्रथम आपल्या मुलाचा बळी देणार असल्याचा धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

सुरेंद्र प्रसाद सिंह असे या तांत्रिकाचे नाव आहे. सुरेंद्र हा पहाडपुर येथील रहिवाशी आहे. हिंदूस्तानने दिलेल्या रिपोर्टनुसार, बेगूसराय येथील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसाठी लिहिण्यात आले आहे. तसेच या घटनेचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु एसडीओ संजीव कुमार चौधरी यांनी अशा पद्धतीचे पत्र घेण्यास नकार दिला आहे. हा प्रकार गंभीर असून मानवी बळी देणे हे अनधिकृत आहे. तसेच पोलिसांकडून या तांत्रिकाचा शोध घेतला जात आहे.तसेच योग्य ती कारवाई या तांत्रिकावर करण्यात येणार आहे.

तांत्रिकाने दिलेल्या पत्रावर बिंदू मा मानव कल्याण संस्थान नावाच्या संघटेनेचे नाव लेटरहेडवर लिहिले आहे. असा दावा केला जात आहे की, हा तांत्रिक या संघटनेचा मुख्य कर्ताधरता आहे. त्याचसोबत ही संस्थचे कायद्यानुसार पंजीकरण करण्यात आले आहे. पागल बाबाच्या नावाने प्रख्यात सिंह यांना सांगितले आहे की, देवी कामाख्याने मानवी बळी देण्याचा आदेश दिला आहे.

स्थानिक नागरिकांनी या पागल बाबला नग्नावस्थेत फिरताना पाहिले आहे. तसेच मानवी कवटी हातात घेऊन सर्वत्र फिरत असल्याचे ही नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली असून लहान मुले हा बाबा पकडून पळवून नेईल अशी भीती पसरली आहे. तसेच त्याने आपल्या इंजिनिअर मुलाला रावणाचे रुप असल्याचे सांगितले असून प्रथम त्याचा बळी देण्यात येणार आहे. मात्र मुलाने मंदिर बनवण्यासाठी पैसे देण्यासाठी नकार दिल्याने हा तांत्रिक मुलाचा बळी देणार असल्याचे ही बोलले जात आहे.