Mumbai Police नी Break The Chain नियमावलीत गर्लफ्रेंडला भेटायला बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या 'आशिका'ला दिला परफेक्ट सल्ला; पहा पोलिसांची प्रतिक्रिया
Mumbai Police Logo | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रामध्ये वाढती कोविड रूग्णसंख्या पाहता आता राज्य सरकारने ब्रेक द चेन (Break The Chain) अंतर्गत नियम कडक केले आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकचं बाहेर पडू शकत असल्याने इतरांना सक्तीने घरात बसणं बंधनकारक आहे. तरूण मंडळीदेखील मागील वर्षभरापासून घरात आहेत. आता नियम पुन्हा कडक झाल्याने टंगळमंगळ करण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठीही कुणी बाहेर पडून शकत नाही. अशातच एका आशिक तरूणाने ट्वीटरवर मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police)  त्याच्या गर्लफ्रेंडला (Girlfriend) भेटण्यासाठी बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्वीट करत त्याने ब्रेक द चेन नियमावलीमध्ये पोलिसांना कोणत्या रंगाचे स्टिकर (Color Code Sticker) घेऊ? असा प्रश्न विचारला होता. पण पोलिसांनी देखील या प्रश्नाला त्यांच्या अंदाजात परफेक्ट उत्तर दिलं आहे.

सध्या मुंबई पोलिसा नागरिकांच्या मदतीला सोशल मीडीयावरही चांगलेच अ‍ॅक्टिव्ह आहेत. मुंबई पोलिसांच्या ट्वीटर अकाऊंटवरून या तरूणाच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी 'तुमच्यासाठी आता हे गरजेचे असेल हे आम्ही समजू शकतो पण सध्या ही गोष्ट अत्यावश्यक या कॅटेगरी मध्ये येत नाही. सध्या 'अंतर' चं प्रेम आणि जिव्हाळा वाढवणार आहे आणि तुम्हांला निरोगी ठेवणार आहे.' मुंबई पोलिसांनी त्यांच्या जोडीला दीर्घकाळ एकत्र राहण्यासाठी शुभेच्छा देत सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबई पोलिस ट्वीट

सध्या बाहेर पडणार्‍या नागरिकांना त्यांच्या गाडीवर अत्यावश्यक सेवेतील कॅटेगरी नुसार 3 विविध रंगांची स्टिकर्स लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत सकाळी 7-11 अशी 4 तासचं किराणा माल, खाद्य पदार्थांची दुकानं खुली असल्याने त्याव्यक्तिरिक्त मेडिकल इमरजन्सी असल्याशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांकडून Color Code पास अत्यावश्यक सेवासुविधांसाठी जाहीर, गैरवापर करणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल- हेमंत नगराळे.

मुंबईमध्ये काल देण्यात आलेल्या माहितीनुसर, कोरोना विषाणूच्या 7684 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णसंख्या 6,01,590 वर गेली आहे.  शहरात 6790 रुग्ण बरे झाले असून, 62 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या मुंबईमध्ये 84,743 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.