मुंबई: राष्ट्रीय महामार्गावर 1 डिसेंबर पूर्वीच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने Fastag च्या माध्यमातून टोल स्विकारण्यास सुरुवात
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी आता 1 डिसेंबर पूर्वीच फास्टटॅगच्या माध्यमातून टोल स्विकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी हा टोल 1 डिसेंबर पासून स्विकारणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार वाहनाला लावलेले फास्टॅग जेव्हा टोलनाक्यावर जाईल तेव्हा तेथील खांब्यावर लागलेला स्कॅनर गाडीवर लावलेल्या स्टीकर ला स्कॅन करेल. ज्यामुळे फास्टॅग अकाउंटवरुन पैसे सरळ कट होतील. हा स्टीकर देशभरात कुठेही प्रवास करताना कामी येईल.

देशात एकूण 155 टोलनाका असून आता इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या माध्यमातून टोल वसूल केला जाणार आहे. त्यासाठी फास्टॅगचा वापर करावा असे आवाहन सुद्धा चालकांना करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यास थोडीफार मदत होणार आहे. टोल नाक्यावर एका बाजूला फास्टॅगची रांग आणि अन्य बाजूला पैसे घेण्यासाठी रांग सुरु करण्यात येणार आहे.(नागरिकांसाठी खुशखबर! देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार)

फास्टटॅग बारकोड आणि फास्टटॅग लेन फायदे

  • टोल भरण्यासाठी वाहनचालकांचा जाणारा वेळ वाचणार
  • टोल नाक्यांवर होणारी वाहनाची रहदारी कमी होणार
  • एखाद्या चालकाने नियम मोडत घुसखोरी केल्यास दंडाची तरतूद

पॅनकार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखे, केवायसीसाठी आवश्यक आयडी प्रूफ दिल्यानंतर तुमचे फास्टॅग अकाउंट तयार केले जाते. यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो देखील आवश्यक आहे. फास्टॅग सर्व टोल प्लाझा व काही बँकांकडून ऑनलाईन खरेदी करता येईल. फास्टॅग रिचार्ज करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आरटीजीएस आणि नेट बँकिंगचा वापर करू शकता. आपण आपल्या फास्टॅग खात्यात किमान 100 रुपये आणि एक लाख रुपयांपर्यंत ठेवू शकता.