नागरिकांसाठी खुशखबर! देशभरातील आधार सेवा केंद्रे आता आठवड्यातील सातही दिवस खुली राहणार
Aadhar Card (Photo Credits: PTI)

'यूआयडीएआय'ने (UIDAI) देशभरातील नागरिकांच्या सोयीसाठी महत्तवपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, देशभरातील सर्वे आधार सेवा केंद्रे (Aadhaar Seva Kendra) आठवड्यातील सातही दिवस खुली ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय थांबणार असून आधार संबंधित प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत. या अगोदर प्रत्येक मंगळवारी आधार केंद्रे बंद असायची. 'यूआयडीएआय'ने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. यात 'यूआयडीएआय'ने म्हटलं आहे की, आता आधार सेवा केंद्रे सातही दिवस खुली राहणार आहेत. प्रत्येक दिवशी 1 हजार आधार एनरॉलमेंट किंवा रिक्वेस्ट अपडेट करण्याची आधार सेवा केंद्रांची क्षमता आहे, असंही यूआयडीएआयने म्हटलं आहे. (हेही वाचा - आधार कार्ड हरवल्यास Re-Print कसे कराल, जाणून घ्या)

विशेष म्हणजे तुम्ही आधार केंद्रावर जाण्याअगोदर ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊ शकता. ऑनलाइन अपॉइंटमेट घेण्यासाठी तुम्हाला यूआयडीएआयच्या पोर्टलवर 'बुक ऑन अपॉइंटमेंट' पेजला भेट द्यावी लागेल. येथे ड्रॉपडाऊन मेन्यूमध्ये आधार सेवा केंद्रांची नावे आहेत. यात दिल्ली, पटणा, बेंगळुरू, हैदराबाद, आग्रा, चेन्नई, हिसार, चंदीगड, लखनऊ, विजयवाडा, भोपाळ, देहरादून, रांची, गुवाहाटी, म्हैसूर आणि जयपूर आदी शहरांची नावे आहेत. तुम्ही आपल्या सोयीनुसार, योग्य आधार केंद्रावर क्लिक करून ऑनलाइन अपॉइंटमेट घेऊ शकता. ऑनलाइन अपॉइंटमेट बुक करताना तुम्हाला तुमचा आधार क्रमांक नोंदवावा लागणार आहे.

'यूआयडीएआय' ट्विट - 

हेही वाचा - आधार कार्ड अपडेट: नाव, नंबर, पत्ता बदलण्यासाठी दरात बदल, द्यावे लागणार अधिक शुल्क

आपल्याला मिळालेले आधार कार्ड आपण भारताचे नागरिक असल्याची ओळख पटवून देते. आपल्या दैनंदिन कामांमध्ये आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास तुम्ही ते पुन्हा रिप्रिंट करता येते. यासाठी UIDAI संकेतस्थळावर ऑर्डर आधार रिप्रिंट (Order Aadhar Re-print) ऑप्शन देण्यात आले आहे. त्याचसोबत आधार कार्डमध्ये काही अपडेट करुन ते पुन्हा प्रिंट करता येते.