समृद्धी महामार्ग (Photo Credit : Twitter)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) जे मुंबई आणि नागपूर दरम्यान भारतातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे (Hindu Hridaysamrat Balasaheb Thackerat Maharashtra Samruddhi Mahamarg) बांधत आहे. आता या मार्गावर पहिली श्रेणी म्हणजे कार आणि जीपसारख्या हलक्या मोटार वाहनांसाठी वन-वेसाठी 1,212 रुपयांचा टोल (Toll) प्रस्तावित केला आहे. या मार्गावरील टोलचे प्रस्तावित दर प्रति किमीच्या आधारावर ठरवण्यात आले आहेत. मुंबई ते नागपूर हे अंतर 701 किमी आहे. ज्या किमीने प्रवास करायचा आहे, त्यानुसार टोल आकारला जाणार आहे. उदाहरणार्थ, जर कोणी मुंबई ते नाशिक किंवा औरंगाबाद दरम्यान प्रवास करत असेल तर वाहनांना प्रति किमी 1.73 रुपये आकारले जातील.

एमएसआरडीसी या वर्षी मार्च किंवा एप्रिलपर्यंत एक्स्प्रेस वेचा नागपूर-औरंगाबाद भाग सुरु करण्याची शक्यता आहे. वर्षाच्या अखेरीस संपूर्ण भाग खुला करण्याची योजना आहे. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 701 किलोमीटर लांबीच्या या मार्गावर एकूण 26 टोलनाके असतील. हे टोलनाके महामार्गावरील 25 इंटरचेंजच्या जवळ असतील. सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संगोतले की, ‘टोलचे हे दर राज्य सरकारशी सल्लामसलत आणि मंजुरीनंतरच प्रस्तावित केले आहेत. प्रस्तावित टोल दर एक्सप्रेसवे उघडण्याच्या काही दिवस आधी अधिकृतपणे सूचित केले जातील.’

टोल दरांच्या यादीनुसार, दुसरी श्रेणी हलकी व्यावसायिक वाहने, हलकी मालवाहू वाहने, मिनी बस अशी आहे. यासाठी मुंबई आणि नागपूर दरम्यानचा एकेरी टोल ₹2.79 प्रति किमी असेल, जो 1,955 रुपयांपर्यंत पर्यंत जाईल. तिसरी श्रेणी बस किंवा ट्रक असेल, ज्यासाठी ₹5.85 प्रति किमी शुल्क आकारले जाईल, जो टोल 4,100 पर्यंत होईल.

उर्वरित तीन श्रेणीत जड वाहने आहेत ज्यात तीन एक्सल व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे, ज्यासाठी 6.38 रुपये प्रति किमी किंवा 4,472 रुपये, त्यानंतर 9.18 रुपये प्रति किमी किंवा 6,435 रुपये टोल शुल्क आकारले जाईल. शेवटची श्रेणी मोठ्या आकाराची वाहने किंवा मल्टी एक्सेल (सात किंवा अधिक एक्सल) आहे, ज्यासाठी टोल प्रति किमी 11.17 रुपये, जो मुंबई-नागपूरसाठी 7,830 रुपये होईल. (हेही वाचा: Mumbai Road Accident: WEH वर बाईकला सिमेंट मिक्सरने धडक दिल्याने 16 महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू)

अहवालात नमूद केले आहे की सध्या, मुंबई आणि नागपूर दरम्यान दररोज 26,000 हून अधिक प्रवासी फ्लाइट आणि ट्रेनने प्रवास करतात आणि त्यापैकी सुमारे 8,000 प्रवासी रस्त्यावर स्थलांतरित होऊ शकतात. एक्स्प्रेस वेच्या बांधकामामुळे आणखी 87 बसेस आणि आणखी 1,166 गाड्या रस्त्यावर धावतील.