Mumbai Road Accident: WEH वर बाईकला सिमेंट मिक्सरने धडक दिल्याने 16 महिन्यांच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

16 महिन्याची मुलगी आणि तिच्या आईचा मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर (WEH) नाहक जीव गेला आहे. तर या मुलीचे वडील जखमी आहे. दरम्यान या विदारक मृत्यूमागे एक विचित्र अपघात कारणीभूत ठरला आहे. गोरेगाव पूर्व येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर शनिवारी घडलेल्या अपघातामध्ये बाईकला सिमेंट मिक्सरने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, वेगात आलेल्या सिमेंट मिक्सरने टू व्हिलरला धडकलं. एक महिला पतीसोबत पिलियन चालवत होती. तर सिमेंट मिक्सरच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. ओबेरॉय मॉल जवळ हा अपघात 11 च्या सुमारास झाला आहे. अब्दुल शेख 26 वर्षीय मदरसा शिक्षक हा पार्ले येथील वाल्मिकी नगरचा रहिवासी होता. तो पत्नी आइ लेकीसोबत प्रवास करत होता.

वेगात आलेल्या मिक्सर ट्रकने त्यांना उडवलं आणि तिघेही रस्त्यावर पडले. शेखचा पाय बाईकमध्ये अडकला. पण त्याची लेक आणि पत्नी रस्त्यावर पडले आणि अवजड वाहानाखाली आले. त्यांच्या मागे शेख यांचा पुतण्या आणि आई होती. त्यांनी तात्काळ हॉस्पिटलमध्ये त्यांना नेले पण तो पर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. नक्की वाचा: Mumbai: मुंबईत रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण 45% नी घसरले, पादचारी, सायकलस्वार, मोटारसायकलस्वारांना होता धोका .

शेख कुटुंब कांदिवलीला त्यांच्या कुटुंबाकडे रात्रीच्या भोजनासाठी गेले होते. परत घरी जाताना हा अपघात झाला आहे. ट्रक ड्रायव्हरला इतर मोटारसायकलिस्टने गाठलं. ट्रक चालक हा 51 वर्षीय सुदर्शन सरोज आहे. कलम 304A अंतर्गत त्याला अटक झाली असून जामीनही मिळाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तो मद्यपान करून गाडी चालवत नव्हता.

दोन महिन्यातला हा दुसरा अपघात आहे ज्यामध्ये गोरेगाव ईस्ट भागात रस्ते अपघातामध्ये चिमुकल्याचा बळी गेला आहे. डिसेंबर महिन्यात 5 महिन्याच्या अरफान पठाणचाही बाईक अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. मोटार सायकल चालक चुकीच्या दिशेने आणि दारू पिऊन गाडी चालवत असताना हा अपघात झाला आहे.