Fraud | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

चित्रपट निर्माता (Filmmaker) असल्याचे सांगून एकाने विदेशी चलन विक्रेत्यास (Forex Dealer) तब्बल 21 लाखांचा चुना लावला आहे. सदर व्यक्ती एका ओळखीच्या व्यक्तीचा संदर्भ देऊन परकीय चलन विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास भेटला. आरोपीचे नाव कृष्णण असल्याचे प्राथमीक माहितीमध्ये पुढे आले आहे. त्याने आपण चित्रपट निर्माता असल्याचे सांगित आपणास तातडीने पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले. ओळखीच्या व्यक्तीचा संदर्भ असल्याने व्यापाऱ्यानेही अधिक चौकशी न करता सदर व्यक्तीस एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये तब्बल USD 25,000 (अंदाजे 21 लाख रुपये) रोख दिले. तोतयाने काहीच वेळात हे पैसे भारतीय रुपयांमध्ये आपल्या बँक खात्यावर जमा होतील असे सांगितले. पण, तसे काहीच घडले नाही. बारच वेळ पैसे परत न आल्याने आपली फसवणूक (Duped) झाल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने वाकोला पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली.

खात्यावर एक दमडाही आला नाही

वाकोला पोलिसांनी दाखल केलेल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (FIR) नुसार, पीडित व्यापाऱ्यास एका ओळखीच्या व्यक्तीकडून कृष्णनचा (आरोपी) संदर्भ मिळाला. पीडित व्यापारी आणि त्याची पत्नी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये 27 फेब्रुवारी रोजी भेटले. कृष्णन याने आपली ओळख चित्रपट निर्माता अशी करुन दिली. तसेच, आपल्याला तातडीने चलन आवश्यक असल्याचे सांगितले. कृष्णन हा ओळीखीच्या व्यक्तीकडून आल्याने व्यापाऱ्यास सुरुवातीला त्याचा संशय आला नाही. त्यामुळे त्याने मोठ्या विश्वासाने चलन दिले. आरोपीनेही या चलनाच्या बदल्यात निश्चित रक्कम आपल्या खात्यावर जमा होईल असे सांगितले आणि तो तिथून निघून गेला. मात्र, बराच वेळ होऊनही खात्यावर एक दमडाही आला नाही. तेव्हा, व्यापाऱ्याच्या मनात शंकेची पाल कुचकूचली. त्याने आणखी थोडा वेळ वाट पाहिली आणि थेट पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. दरम्यान, वाकोला पोलीस आरोपी कृष्णन आणि त्याच्या साथीदाराचा शोध घेत आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. प्रकरणाचा तपास सुरु आहे. (हेही वाचा, Matrimonial Fraud: मॅट्रीमोनीअल साईट्स वापरुन 250 महिला जाळ्यात; फसवणुकीच्या गुन्ह्यात तोतयास अटक)

दरम्यान, अलीकडील काही काळात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. खास करुन सायबर गुन्हेगार विदेशी चलन, पार्टटाईम जॉब, ऑनलाईन नोकरी, डेटींग अॅप, डेटींग साईट्स, मेट्रोमोनीअल साईट्स यांवरुन सायबर गुन्हेगार सावज शोधतात. एखादा व्यक्ती जरी यांच्या सानिध्यात आला तरी ते त्यांचे बँक खाते हातोहात खाली करतात.