Navi Mumbai: नवी मुंबई येथील एका 71 वर्षीय वृध्दाची 23 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वृध्द व्यक्ती हे निवृत्त भारतीय नौदल अधिकारी आहे. एका विमा पॉलिसी कंपनीने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्दात गुन्हा दाखल झाला. (हेही वाचा- व्यवसायिकेच्या घरी नोकराने मारला डल्ला, 15.30 लाख रुपयाचे सोने चांदी घेऊन फरार)
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नवी मुंबई येथील रहिवासी आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तक्रारदाराच्या पत्नीचे निधन झाले होते.फेब्रुवारीमध्ये त्यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्यांच्या पत्नीने २०१४ रोजी ४५ लाख रुपयांची विमा पॉलिसी घेतल्याची माहिती दिली. त्याला या वर्षी डिसेंबरपर्यंत ४५ लाख रुपये मिळतील अशी देखील माहिती दिली. त्यांनतर ही माहिती पटवून देण्यासाठी तक्रारदाराने विमा कंपनीचे बोगस कागदपत्रे व्हॉट्अॅपवर शेअर केली.
पैशांच्या हवाश्यापोटी तक्रारदाराने फवणूक करणाऱ्याच्या बॅंकेत फेब्रुवारी ते जून महिन्यात पैसे ट्रान्सफर केले. वृध्द व्यक्तीने काही दिवसानंतर विमा कंपनीशी संपर्क साधला. पंरुत त्यावेळीस आरोपीने त्याच्याशी त्यांनी फोन उचलला नाही. बरेच दिवस असंच सुरु राहिलं त्यानंतर तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे समजले. या घटनेनंतर तक्रारदाराने नवी मुंबईतील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्दात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ सी अंतर्गत गुन्हा दाखल केला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६सी (ओळख चोरी) अंतर्गत