कल्याण: प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याच्या घटना आपण आजवर ऐकल्या असतील त्यातलाच एक प्रकार कल्याण मध्ये सुद्धा घडला, पण या खुन्याने वापरलेली पद्धत ऐकाल तर तुम्हालाही क्षणभर चक्रावल्यावाचून राहणार नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, कल्याण (Kalyan) मधील नीलम गेस्ट हाऊस मध्ये धक्कादायक पद्धतीने एका तरुणीचा खून करण्यात आला होता. या तरुणीच्या कथित प्रियकराने सुरवातीला ब्लेडने आपल्या हाताची नस कापून कुंकवाच्या रूपात आपल्या प्रेयसीच्या कपाळी रक्त लावले, त्यानंतर स्वतःच्या फोनमध्येच त्याने तिच्यासोबत फोटो काढला, आणि त्यानंतर तिची हत्या केली, आणि नंतर स्वतःही आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तपासादरम्यान त्यांना या युगुलाचा तो सेल्फी सुद्धा प्राप्त झाला, ज्यातून हा प्रकार उघडकीस आला. बायकोची हत्या करुन मृतदेह ठेवला फ्रिजमध्ये; न्यायालयाने ठोठावला मृत्यूदंड
प्राप्त माहितीन्वये, या आरोपीचे नाव अरुण तर मृत तरुणीचे नाव प्रतिमा असे आहे. अरुण हा उत्तर प्रदेशातील आजमगढचा मूळ रहिवाशी आहे. 12 वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर त्याने आपल्या वडिलांसोबत घरगुती व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली होती. साधारण एका वर्षांपूर्वी फेसबुक वरून अरुण आणि प्रतिमाची ओळख झाली होती ज्यावेळेस प्रतिमाचे शिक्षण सुरु होते तसेच ती मुंबईत एका बँकेत काम सुद्धा करत होती,काही दिवसांपूर्वी अरुण आपल्या वडिलांना वाराणसीला जात असल्याचे सांगून मुंबईसाठी रवाना झाला. मुंबईत येताच त्याने सर्वात अर्धे कल्याणला जाऊन प्रतिमाला भेटण्याचा प्लॅन केला होता त्यानुसार तो शुक्रवारी तिला घेऊन नीलम गेस्ट हाऊस मध्ये गेला. आणि मग हा सर्व खुनाचा प्रकार घडला. धक्कादायक! Sex ला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या करून पतीने स्वतःचेच गुप्तांग कापले, पोलिसांकडे दिली कबुली
याबाबत काहीच कल्पना नसलेल्या गेस्ट हाऊस मधील कर्मचाऱ्यांनी जेवणाचे विचारण्यासाठी बराच वेळ अरुण आणि प्रतिमाच्या रूमचा दरवाजा ठोकावला मात्र त्यानंतर सुद्धा त्यांनी काहीच प्रतिसादड न दिल्याने त्यांनी घाबरून पोलिसाना बोलावून घेतले. पोलीस घटनास्थळी पोहचताच, त्यांनी रूमचा दरवाजा तोडला आणि तेव्हा त्यांना समोरच प्रतिमा मृतावस्थेत पडलेली दिसून आली. तर अरुणचा मृतदेह हा फॅनला लटकलेला होता.अरुणने स्वतः आत्महत्या करण्याआधी प्रतिमाला उशीने तोंड दाबून मारले असणार असा अंदाज पोलीस वर्तवत आहेत.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु असून शनिवारी, अरुणच्या कुटुंबियांना सोपवण्यात आला.