धक्कादायक! Sex ला नकार देणाऱ्या पत्नीची हत्या करून पतीने स्वतःचेच गुप्तांग कापले, पोलिसांकडे दिली कबुली
Image used for representational purpose | File Photo

उत्तर प्रदेश: सुखी वैवाहिक जीवनासाठी पतीपत्नीच्या भावनिक नात्यासोबत शारीरिक सुख सुद्धा नक्कीच महत्वाचे असते. मात्र या शरीरसुखाच्या आहारी जाणे बऱ्याचदा व्यक्तीला अक्षरशः वेड लावू शकते, अशा व्यक्तीला स्वतःच्या कृत्यांवर देखील नियंत्रण ठेवता येत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सिद्धार्थनगर (Siddharthnagar) जिल्ह्यात पाहायला मिळाला. आपल्याला सेक्सला (Sex) नकार दिला म्हणून रागाच्या भरात एका माथेफिरू पतीने स्वतःच्या पत्नीची हत्या केली, आणि इतक्यावरच न थांबता पुढे या इसमाने स्वत:चेच गुप्तांग (Private Parts) कापल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.आरोपी पतीचे नाव अनवारूल हसन (Anvarul Hasan) असे असून त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबई: सेक्स करण्यास नकार दिल्याने मॉडेलची हत्या, मानसी दीक्षित खून प्रकरणात धक्कादायक खुलासा

पोलिसांच्या  माहितीनुसार,  अनवारूल हा सिद्धार्थनगर जिल्ह्यातील काकरा पोखरचा रहिवाशी असून सुरत येथे काम करतो. वर्षभरापूर्वी त्याचं मेहनाज या तरुणीशी लग्न झालं होतं. सुरतहून सुट्टीसाठी तो घरी आला होता. घरात कोणीच नसताना त्याने मेहनाज जवळ सेक्स करण्याची इच्छा व्यक्त केली. मेहनाजने नकार देताच त्याने मेहनाजचा खून केला आणि नंतर स्वत:चे गुप्तांग कापले. या दोघांच्याही किंकाळ्या ऐकून घराबाहेर शेजारी जमा झाले. सारा प्रकार लक्षात येताच त्यांनी लगेच पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी मेहनाजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून जखमी अनवारूल हसनला बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पिताळात दाखल करण्यात आलं आहे. सेक्स करण्यात अडथळा येत असल्याने आई-वडीलांनीच घेतला दीड महिन्याच्या बाळाचा जीव

दरम्यान पोलिसांच्या चौकशी दरम्यान, रागाच्या भरात आपण हे कृत्य केलं असल्याची बाब अनवारूल हसन याने कबूल केली आहे. तर मेहनाजच्या वडिलांनी अनवारूल तिचा वर्षभरापासून हुंड्यासाठी छळ करत असल्याची माहिती दिली आहे.