सेक्स करण्यात अडथळा येत असल्याने आई-वडीलांनीच घेतला दीड महिन्याच्या बाळाचा जीव
Baby | Representational Image | (Photo credits: Unsplash/Representational Image)

सेक्स करण्यात बाळाच्या रडण्याचा अडथळा येत असल्याने एका जोडप्याने चक्क आपल्या 9 आठवड्याच्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. टायलर मॉर्गन असे या मृत बाळाचे नाव आहे.  बाळाच्या जन्मामुळे सेक्स करण्यासाठी वेळ मिळत नव्हता आणि त्यावरुन होत असलेल्या वादामुळे ल्यूक मॉर्गन (26) आणि एम्मा कोल (22) यांनी हे भयंकर पाऊल उचलले.

टायलरचा जन्म 27 फेब्रुवारी 2014 मध्ये झाला होता. बाळाला असलेल्या त्रासामुळे तो सातत्याने रडत असे. त्यामुळे त्रासलेल्या ल्युक आणि एम्मा यांनी 29 एप्रिल 2014 रोजी सकाळी बर्नटवुड (Burntwood) येथील स्टॅफर्डशायर (Staffordshire) स्थित आपल्या दोन बेडरुमच्या घरात गळा दाबून बाळाची हत्या केली. त्यावेळेस ल्यूक 22 तर एम्मा 18 वर्षांची होती. त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी बाळाच्या फुफ्फुसात फ्रॅक्चर असल्याचे दोघांनी सांगितले. बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या

एम्मा कोल हिने दिलेल्या माहितीनुसार, टायलरला थंड पाण्याने अंघोळ घातल्यास तो जागा राहत असे तर गरम पाण्याने अंघोळ घातल्यास झोपत असे. त्यामुळे बाळाला झोपवण्याचा त्यांच्याकडे हाच एक सोयीस्कर मार्ग होता. तसंच ल्यूक बाळाच्या जीभेवर लिंबाचा रस लावत असे त्यामुळे बाळ शांत राहत असे. तर अनेकदा खूप चिडल्यानंतर ल्युक बाळाला मारहाण करत असे. या सर्व प्रकारानंतर दोघांच्याही नात्यात काहीतरी वाद, ताण असल्याचे म्हटले जात आहे.