चीनमधील शांघाय (Shanghai) शहरात एक विचित्र घटना पुढे आली आहे. येथील झू शियाओडोंग नावाच्या एका 30 वर्षीय व्यक्तीने स्वत:ची पत्नी यांग लिपिंग हिची हत्या करुन तिचा मृतदेह तब्बल 100 दिवस फ्रिजमध्ये ठेवला. या प्रकरणाचा तपास केल्यावर न्यायालयाने पतीला दोषी ठरवत मृत्युदंड ठोठावला. चीनचे सरकारी वृत्तपत्र चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार आरोपी पती आपला गुन्हा लपविण्यासाठी दुसऱ्या एका महिलेसोबत फिरत होता.
आरोपीने पत्नी यांग लिपिंग हिच्या क्रेडिट कार्डवरुन तब्बल 150,000 युआन (21,800 अमेरिकी डॉलर) इतके पसैही खर्च केले. प्राप्त माहितीनुसार यांग लिपिंग (वय- 30 वर्षे) ही तिच्या आईवडीलांची एकुलती एक मुलगी होती. आपल्या मुलीच्या आकस्मिक बेपत्ता होण्याने त्यांना मोठा धक्का बसला होता.
दरम्यान, शांघाय नंबर 2 मधील इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने झू शियाओडोंग याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात झू याने शांघायच्या उच्च न्यायालयात आपील केले होते. मात्र, उच्च न्यायालयानेही इंटरमीडिएट पीपल्स कोर्टाने दिलेली शिक्षा कायम ठेवत असल्याचा निर्णय दिला. (हेही वाचा, अमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक! 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या)
दरम्यान, झू शियाओडोंग आणि त्याची पत्नी यांग लिपिंग या दोघांमध्ये गेले काही दिवस वाद होता. तरीही हे दोघे सोबत राहात असत. दरम्यान, पत्नी यांग लिपिंग हिच्या मृत्यूची बातमी ऐकून परिसरात हळहळ व्यक्त होत होती.