प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

लॉस अँजेलिस: पैश्यांच्या हव्यासापोटी माणूस कोणत्याही ठरला जाऊ शकतो याचा प्रत्यय देणारी एक घटना अलीकडेच अमेरिकेत घडली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अलास्का (Alaska)  शहरात राहणाऱ्या डेनाली ब्रेह्मर (Denali Bremhar) या 18 वर्षाच्या तरुणीने ऑनलाईन बनावाला बळी पडून आपल्याच जवळच्या मैत्रणीची हत्या केल्याचे समजत आहे. या प्रकरणी तपास करत असताना पोलिसांना डेनाली व तिची ऑनलाईन मैत्रीण डेरिन शिल्मिलर  यांच्याविषयी माहिती मिळाली. शिल्मिलर ही इंडियाना येथील एक 21 वर्षीय तरुणी असून काही दिवसांपूर्वी डेनाली व तिची ऑनलाईन मैत्री झाली होती. मात्र शिल्मिलर हिने आपली ओळख टायलर या खोट्या नावाने एक धनाढ्य व्यक्ती म्ह्णून करून दिली होती.

या प्रकरणी कोर्टात सुनावणीदरम्यान डेनाली व शिल्मिलर या दोघी अनेक दिवसांपासूनच्या चॅटचे पुरावे सादर करण्यात आले होते. . यातील काही मॅसेज मध्ये डेनालीने आपल्या एका मित्राची हत्या केल्यास आपण तिला 90 लाख डॉलर्सची भेट देण्याचे आश्वासन शिल्मिलरने दिले होते. तसेच त्या दोघींच्या संवादात अलास्का मध्ये हत्या व बलात्कार करण्याच्या संदर्भात देखील काही उल्लेख होते. 90 लाख डॉलर्सच्या या ऑफरला भुलून मग डेनालीने आपली मैत्रीण सिंथिया हॉफमैन च्या खुनाचा कट आखला. गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना भेटायला गेला आणि त्याला कळले की तिच्या आईसोबतच ह्याआधी केला होता 'वन नाइट स्टँड'

डेनालीने आपल्या प्लॅन मध्ये अन्य चार जणांना हाताशी घेऊन तिने सिंथियाला सोबत ट्रेकला येण्यास तयार केले. ट्रेकच्या दिवशी डोंगरावर पोहचताच या चौघांनी 19 वर्षीय सिंथियाचे हात पाय बांधून तिच्या डोक्यावर गोळी झाडली. थेट मेंदूवर आघात झाल्याने सिंथिया जागच्या जागीच मरण पावली त्यानंतर या चौघांनी तिचा मृतदेह डोंगरावरून खाली नदीत फेकून दिला.दरम्यान संपूर्ण घटनेच्या वेळी डेनाली हिला शिल्मिलरने फोटो व व्हिडीओ काढून पाठवण्यास सांगितले होते, त्यानुसार तिने स्नॅपचॅट वरून या घटनेला रेकॉर्ड करून शिल्मिलर ला पाठवले होते.