सोशल मिडिया आणि आधुनिक स्मार्टफोन्समुळे ऑनलाईन डेटिंग आता खूपच सामान्य आणि सहज झाली आहे. ऑनलाईन डेटिंगमुळे आता जग खूप छोटे झाले आहे असे वाटायला लागलय. येथे डेटिंगच्या माध्यमातून तुमचा अनेक लोकांशी संबंध येतो. ऑनलाईन डेटिंगमध्ये 'वन नाईट स्टँड' सुद्धा करतात. ऑनलाईन डेटिंगसाठी टिंडर अॅप खूपच लोकप्रिय आहे. ह्याच्या माध्यमातून एक ऑनलाईन डेटिंगचा एक आश्चर्यचकित करणारा किस्सा पाहायला मिळाला. पाहा काय आहे तो किस्सा...
एक 21 वर्षीय तरुण आपल्या गर्लफ्रेंडच्या आईला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. तेव्हा त्याला कळले की, आपण ह्याआधी तिच्या आईला ऑनलाईन डेटिंगच्या माध्यमातून डेट केले आहे. इतकंच नव्हे तर तिच्या आईसोबत रात्र देखील घालवली आहे. त्या तरुणाने हा अनुभव रेड्डिट वर शेअर केला. त्याने सांगितले 'जेव्हा मी माझ्या गर्लफ्रेंडच्या आईला भेटायला गेलो तेव्हा कळले की तिच्या आईसोबत मी रात्र घालवली आहे. त्याने सांगितले, मी जिथे राहतो, तिथे मोठा क्लब नाही. त्यामुळे नेहमी तेच तेच चेहरे पाहायला मिळायचे. त्यामुळे आपल्या शहरातील तो एक रॉक बारमध्ये गेला, जिथे त्याला एका कोप-यात एक बाई दिसली. त्या दोघांचे बोलणे झाले आणि फोन नंबरची देवाणघेवाण झाली. काही आठवड्यानंतर त्याला ती महिला पुन्हा भेटली आणि तेव्हा त्या दोघांनी एक रात्र देखील घालवली. ती महिला म्हणजेच माझ्या आताच्या गर्लफ्रेंडची आई होती.'
त्या तरुणाने आपल्या पोस्टमध्ये असेही म्हटले की, जेव्हा मी त्या महिलेला भेटलो, तेव्हाच्या तुलनेत ती आता खूप वयाने वाटत होती. मात्र तरीसुद्धा मला ती आवडली होती. मला असं वाटलं हिच्यासोबत राहून मला 4 नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पण आता मी शिकलो आहे की कुशलतेने एखाद्या गोष्टीचा पश्चाताप कसा करायचा ते. त्या महिलेसोबत रात्र घालवल्यानंतर मी तिला परत कधीही भेटलो नाही. कदाचित मी तिला विसरुनच गेलो होतो. त्यानंतर काही दिवसांनी माझी एका 19 वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. ती सुद्धा टिंडरच्या माध्यमातून. आम्ही एकमेकांना डेट करणे सुरु केल्यानंतर आम्हाला एकमेकांची सोबत आवडू लागली. म्हणून तिने माझी तिच्या पालकांसोबत भेट करुन द्यायचे ठरवले. त्यासाठी तिने मला तिच्या घरी बोलावले.
जेव्हा मी तिच्या घरी जायला लागलो तेव्हा मला कळले की, मी माझ्या जुन्या डेटच्या घरी जात आहे, जिच्यासोबत मी तिथे रात्र घालवली होती. तेव्हा मी तिला विचारले, तू इथे कधीपासून राहते. तेव्हा ती म्हणाली, मी, माझी आई,बाबा, बहिण आणि कुत्रा असे आम्ही गेले कित्येक वर्ष एकत्र राहत आहोत. मग जेव्हा मी माझ्या जुन्या डेट बद्दल सांगितले आणि तिच्या आईचे पुर्ण नाव सांगितले. तेव्हा ती ही आश्चर्यचकित झाली. मात्र तिने कोणताही आकांड-तांडव न करता माझे सर्व ऐकून घेतले. पण ते सांगितल्यावर आम्ही एकमेकांना नजर मिळवू शकलो नाही. कारण मला माहित होते की, मी ह्यापुढे तिला कधीच भेटू शकणार नाही. हे जितकं खरं असलं तरी ,मला ती खूप आवडायची हेही तितकच खरं होतं.