Revenge Porn Video: पूर्व प्रियकराने महिलेच्या कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना पाठवली तिची Sex Tape, त्यानंतर जे झाले...
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सामान्यतः ब्रेकअप (Breakup) नंतर प्रियकर प्रेयसी एक-दुसऱ्यापासून वेगळे होऊन आपले नवीन आयुष्य सुरु करतात. मात्र प्रेमाच्या बदल्यात मिळालेल्या रागाची, बदल्याची एक धक्कादायक घटना स्पेनमध्ये (Spain) घडली आहे. स्पेनच्या अल्काका डे हेनेरेस (Alcala de Henares) शहरात आधीच्या प्रियकराने रागाने आणि बदला घेण्याच्या भावनेने दोन मुलांची आई असलेल्या महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे. या माथेफिरू प्रियकराने ब्रेकअप नंतर बदला घेण्यासाठी महिलेची सेक्स टेप तिच्या कुटुंबियांना आणि तिच्या सहकाऱ्यांना पाठवली. त्यानंतर शरमेने या महिलेकडे आत्महत्या करण्यापासून कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार 32 वर्षीय वेरोनिका रूबीओ (Veronica Rubio) नावाची महिला सेन फर्नांडो डे हेनर्स (San Fernando de Henares) मध्ये सीएनएच इंडस्ट्रियल लॉरी कारखाना (CNH Industrial lorry factory) काम करत होते. त्या दरम्यान तिथल्या एका सहकाऱ्याशी ती डेट करू लागली. जेव्हा दोघे शारीरिक दृष्ट्या एकत्र आले त्यावेळी या व्यक्तीने दोघांच्या सेक्सचा व्हिडिओ बनवला. कालांतराने, काही कारणांनी हे नाते संपून दोघांचे वेगळे मार्ग झाले. मात्र तिच्या या पूर्वीच्या प्रियकराला हे आवडले नाही, तिने हे नाते संपवल्याचा राग त्याच्या मनात होता.  त्यानंतर त्याने या महिलेला सेक्स व्हिडीओबद्दल धमकी देणे सुरु केले. तरी महिला परत येत नाही हे पाहून याने चिडून तो व्हिडिओ तिच्या कुटुंबाला आणि इतर सहकाऱ्यांना पाठवला. (हेही वाचा: बायकोचा सेक्स व्हिडिओ नवऱ्याने पाहिला, मुलांसमोर झाडल्या गोळ्या)

ब्रेकअप नंतर वेरोनिकाचे लग्नही झाले होते, तिला 2 मुले होती. तरी हा आधीचा प्रियकर तिच्यावर नात्यासाठी दबाव टाकत होता. वेरोनिकाने त्याला वेळोवेळी नकारही दिला. मात्र इर्श्येच्या अगीत या व्यक्तीने हे कृत्य केले. त्यानंतर या महिलेने आपल्या HR ला या बाबत सांगितले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला, यामध्ये तिच्या काही सहकाऱ्यांनीही तिची साथ द्यायची तयारी दर्शवली. मात्र पोलिसांकडे जाण्याऐवजी या महिलेने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. सध्या स्पेन पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.