मुंबई विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी COVID19 च्या RT-PCR चाचणीची सुविधा उपलब्ध
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport. (Photo Credits: ANI)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आता कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभुमीवर RT-PCR चाचणीची सुविधा उपलब्ध करुन दिली गेली आहे. ही सुविधा विमानतळावर येणाऱ्या प्रत्येकासाठी म्हणजे एखाद्या व्यक्तीला सोडण्यासाठी आलेल्या अथवा घेण्यासाठी आलेल्यांसाठी सुद्धा असणार आहे. याबद्दल विमानतळावरील ऑपरेटने एका विधनात असे म्हटले आहे की, ही सुविधा देशाअंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनाच्या काळात सुरु करण्यात आली आहे.(Mumbai Local Train Update: महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव रेल्वेकडून नामंजूर)

विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता त्यांच्या गंतव्य ठिकाणी पोहचण्यापूर्वी CSMIA चाचणी करावी लागणार आहे. तसेच एखाद्या प्रवाशाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याला होम क्वारंटाइन राहण्याची आता गरज भासणार नाही आहे. तर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या किंवा बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना या सुविधेमुळे आता काहीसा दिलासा मिळणार आहे.(खुशखबर! उद्यापासून 453 वरून 481 नव्या उपनगरीय रेल्वे सेवा सुरु होणार; Central Railway ची घोषणा)

तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशाला या चाचणीसाठी ऑनलाईन बुकिंग ही करता येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना www.csmia.aero या संकेतस्थळाला भेट किंवा हेल्पलाइन क्रमांकावर फोन करुन आरटी-पीसीआर चाचणी संदर्भात पैसे भरता येणार आहेत. चाचणी केल्यानंतर प्रवाशाला डिजिटल कॉपी मिळणार आहे. तसेच आठ दिवसांनी चाचणीचा रिपोर्ट हाताता दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाश्याला प्रवासापूर्वी 8-12 तास विमानतळावर दाखल व्हावे असे सांगण्यात आले आहे. आतापर्यंत जवळजवळ 3340 जणांची चाचणी करण्यात आली आहे. प्रत्येक दिवसाला 1 हजारांहून अधिक चाचण्या केल्या जातात. आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 38 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोविड पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींना त्यांच्या राज्यातील क्वारंटाइन सेंटर्समध्ये पाठवण्यात आले आहे.