कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) महाराष्ट्रात गेल्या 7 महिन्यांपासून लोकल सेवा सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांव्यतिरिक्त अन्य लोकांना लोकल मध्ये प्रवेश मनाई आहे. मात्र अनलॉक 5 (Unlock 5) च्या टप्प्यात हळूहळू एक एक सेक्टर सुरु होत असून रेल्वे प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. यामुळे लोकल ट्रेनमध्ये (Local Railway) सोशल डिस्टंसिंगच्या (Social Distancing) नियमांचे तीन-तेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळणे कठीण होत आहे. यामुळे अलीकडेच लोकलच्या फे-या 431 वरुन 453 केली होती. मात्र तरीही रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढतच आहे. यामुळे आता या फे-या 453 वरुन 481 करण्यात आली आहे अशी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी सामाजिक अंतर कायम राखणे आण गर्दी करणे टाळणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत लोकल रेल्वेत गर्दी वाढत चालली आहे. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून उपनगरीय रेल्वे सेवा वाढवत 481 करण्यात आली आहे. उद्यापासून म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून ही या अधिक फे-या रेल्वे रुळावर धावतील. Mumbai Local Updates: मध्य आणि हार्बर मार्गावर आजपासून 22 अधिक लोकल फेऱ्यांची भर; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी Slow Trains ची सोय
In order to maintain social distancing & avoid crowding, Central Railway increased the number of suburban services to 481 for staff as notified by Maharashtra govt from October 15.
— ANI (@ANI) October 14, 2020
कोविड-19 संकट अद्याप संपलेले नाही. परंतु, विशेष खबरदारी घेत अनलॉकींगला सुरुवात झाली आहे. सध्या देशासह राज्यात अनलॉक 5 सुरु आहे. या अंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार्स, फुडकोर्ड्स, सिनेमागृह, स्विमिंग पूल पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, त्यासाठी विशिष्ट नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे अनलॉकच्या या टप्प्यातही लोकल सेवा सामान्यांसाठी खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकल सेवा कधी सुरु होणार या प्रतिक्षेत नागरिक आहेत.