मुंबई: कोरोनाबाधित रुग्णांकडून अतिरिक्त बिलाचे पैसे घेतल्याने माहिम मधील रुग्णालयाचा महापालिकेकडून परवाना रद्द
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

मुंबईतील माहिम येथील कोविड19 साठीच्या खासगी रुग्णालयात रुग्णलयांकडून गेला एक महिना बिलाचे अधिक पैसे घेतले जात असल्याचा प्रकार समोर आला. तर फॅमिली केअर हॉस्पिटल येथे एक 34 वर्षीय व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला असता त्याचा 24 तासातच मृत्यू झाला. तर मृत्यूनंतर त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती पण त्याला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी झाल्याचे दिसून आले नाही. यानंतर रुग्णालयाने त्यांनी रुग्णाकडून अतिरिक्त बिलाचे पैसे घेतल्याचा आरोप अमान्य करु लागले.(धक्कादायक! पुणे येथील हडपसर परिसरातील सह्याद्री रुग्णालयात वॉर्डबॉयकडून एका कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग)

रुग्णाच्या नातेवाईकांनी असे म्हटले की, डॉक्टरांनी रुग्णामध्ये कोविड19 ची लक्षणे दिसून येत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले. यामुळे काळे यांच्या नातेवाईकांनी रुग्णाला मांटुगा मधील एका लोकल रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आणि डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल व्हायला सांगितले होते. त्यामुळे अखेर त्यांनी रुग्णाला त्याच रात्री फॅमिली केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुग्णाचा मृत्यू झाला. काळे यांचा शाळेच्या कपड्यांच्या उत्पादनाचा व्यवसाय आहे.

डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णासाठी Tocilizumab हे कोरोनासाठी वापरण्यात येणारे औषध तातडीने आणण्यास सांगितले. त्यांनी कोविड19 साठी स्वॅब सॅम्पल 25 जुलैला घेतले होते. परंतु त्यानंतर रिपोर्ट आलाच नाही. ऐवढेच नाही त्यांनी दुसऱ्यांच्या औषधांचा कागद देण्यासह Vials मीरा रोड येथून आणण्यास सांगितले. यासाठी त्यांनी 40 हजार रुपये सुद्धा खर्च केला. परंतु रुग्णाचा नंतर मृत्यू झाल्याने रुग्णालयाने नातेवाईकांना तब्बल 2.25 लाखांचे बिल हातात दिले. परंतु हे बिल रिव्हाईज केले असता ते फक्त 36 हजार रुपये होते.(पुण्यात जुलै महिन्यात जवळजवळ 400 कोरोना व्हायरस मृत्यूंची नोंदच नाही; महापौर मुरलीधर मोहोळ यांचा आरोप)

यावर महापालिकेने असे म्हटले आहे की, रुग्णालय हे 25 बेड्सचे आहे. तर रुग्णालये रुग्णांकडून अतिरिक्त बिलाची रक्कम वसूल करत असल्याच्या यापूर्वी सुद्धा तक्रारी समोर आल्या आहेत. यावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिमच्या रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस धाडली.  त्यांनी रुग्णांकडून आम्ही अधिक बिलाची रक्कम घेत असल्याचे रुग्णालयाने मान्य केले. तरी सुद्धा रुग्णांकडून नंतर अधिक बिलाची रक्कम घेणे सुरुच ठेवले होते. यावर महापालिकेने आता रुग्णालयाचा 30 दिवसांसाठी परवाना रद्द केला आहे. तसेच रुग्णालयाने कोणत्याही नव्या रुग्णाला उपचारासाठी दाखल करुन घेऊ नये असे आदेश सुद्धा दिले आहेत. रुग्णालयाची इमारत सील करण्यात आली असून तेथील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात किंवा कोविड सेंटर्समध्ये 48 तासात हलवण्यात येणार असल्याचे जी-नॉर्थ वॉर्डचे असिस्टंट महापालिका आयुक्त यांनी म्हटले आहे.