MPSC PSI Mains 2018 Final Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगा तर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक गट-ब 2018 परीक्षेचा निकाल जाहीर, mpsc.gov.in वर पहा उत्तीर्ण उमेदवारांची यादी
MPSC Exam | Image used for Representational Purpose | (Photo Credits: Pixabay.Com)

MPSC PSI Mains 2018 Final Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक गट-ब 2018 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 387 पदांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील वैभव नवले हे राज्यातून प्रथम आले आहेत. तर महिलांमधून सातारा जिल्ह्यातील दिपाली कोळेकर या अव्वल आल्या आहेत. त्याचबरोबर मागासवर्गवारीतून नगर जिल्ह्यातून ज्ञानदेव काळे हे प्रथम आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तुम्ही हा निकाल पाहू शकता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेली पोलिस उपनिरीक्षक गट-ब साठी राज्यभरातून 387 उमेदवार परीक्षेला बसले होते. महत्वपूर्ण आणि तितकीच अवघड समजल्या जाणा-या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील वैभव नवले अव्वल आले आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

हेदेखील वाचा- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर MPSC च्या परिक्षा पुढे ढकलण्याची राज्य सरकारकडून सुचना

Maharashtra DGIPR चे ट्विट:

त्याचबरोबर तुम्ही mpsc.gov.in या संकेतस्थळावरून उत्तीर्ण उमेदवारांची नावे तसेच निकालासंबंधी अन्य माहिती पाहू शकता. या निकालाबाबत ज्या उमेदवारांना पडताळणी करायची असेल त्यांनी आपली गुणपत्रिका 10 दिवसाच्या आत  ऑनलाईन पद्धतीने आयोगाकडे पाठवावीत.